लोक 100 रुपयांच्या जागी 110 रुपयांचं पेट्रोल का भरतात, याचा खरंच फायदा होतो?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरताना तुम्हीही 100, 200, 500 आणि 1000 रुपयांचं पेट्रलो भरता का? तुम्ही असं करत असाल तर याचा खरंच फायदा होतो का चला पाहूया...
आपल्यापैकी बहुतेक जण पेट्रोल पंपावर जातात तेव्हा आपण 100 किंवा 200 रुपयांसारख्या गोल आकड्यांमध्ये पेट्रोल भरतो. पण तुम्ही काही लोकांना 110 किंवा 495 रुपयांचे पेट्रोल किंवा डिझेल भरताना पाहिले असेल. पण असं का? त्यामागील खरे कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पेट्रोल पंपांवरील मशीन्स आणि तिथे होणाऱ्या गणितांबद्दल काही मनोरंजक तथ्ये येथे आहेत. जी तुम्हाला कदाचित माहिती नसतील. तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल की 100 ऐवजी 110 रुपयांचे पेट्रोल भरण्याचा काय फायदा आहे, तर वाचा.
advertisement
advertisement
अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, राउंड फिगरमध्ये काही प्रकारची "सेटिंग" आहे. याचा अर्थ असा की जर पेट्रोल 500 रुपयांवर निश्चित केले तर ग्राहकांना भीती वाटते की काही सॉफ्टवेअर त्रुटीमुळे थोडे कमी प्रमाणात पेट्रोल वितरित केले जाऊ शकते. म्हणूनच बरेच लोक आता 500 रुपयांऐवजी 495 किंवा 510 रुपयांना पेट्रोल ऑर्डर करत आहेत.
advertisement
advertisement
आता 100 रुपयांऐवजी 110 रुपयांना पेट्रोल भरल्यास तुम्हाला जास्त पेट्रोल मिळेल का या प्रश्नाकडे वळूया. जेव्हा तुम्ही 110 किंवा 120 रुपयांना पेट्रोल भरता. तेव्हा गोल आकड्यांऐवजी, मोजणीत थोडा फरक असू शकतो. तसंच, 110 रुपयांना पेट्रोल भरल्याने सर्वोत्तम दर्जाचे किंवा भरपूर पेट्रोल मिळेल याचा कोणताही निश्चित पुरावा नाही. हा फक्त एक लोकप्रिय समज आहे.
advertisement
advertisement
advertisement
तुम्हाला वाटत असेल की, तुमची फसवणूक झाली आहे, तर तुम्ही https://pgportal.gov.in/ पोर्टलला भेट देऊन तक्रार दाखल करू शकता. किंवा तुम्ही पेट्रोल पंपावर प्रदर्शित होणाऱ्या टोल-फ्री नंबरवर कॉल करू शकता. पंप मालकांकडून फसवणूक झाल्याचे पुरावे आढळले तर त्यांना मोठा दंड भरावा लागेल. (टीप: ही माहिती इंटरनेट स्रोतांवरून घेतली आहे; अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या).











