Indian Railway : रेल्वेचे रूळ खुल्या मैदानात असूनही चोरी का होत नाहीत? लोखंड असूनही चोर त्याकडे का फिरकत नाहीत; कारण वाचून थक्क व्हाल

Last Updated:
आजच्या काळात जिथे घराबाहेर ठेवलेली सायकल किंवा साधी लोखंडी वस्तूही चोरीला जाते, तिथे हजारो किलोमीटरपर्यंत खुल्या मैदानात पसरलेले हे रेल्वेचे लोखंडी रूळ चोरी का होत नाहीत?
1/7
मुंबई : रेल्वेचा प्रवास म्हणजे खिडकीबाहेर पळणारी झाडं, चहावाल्याचा आवाज आणि तो विशिष्ट 'खडक-खडक' असा येणारा लयबद्ध आवाज. आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधी ट्रेनने प्रवास केलाच असेल. लांबच्या प्रवासात तासन् तास खिडकीतून बाहेर पाहताना आपण अनेक गोष्टी नोटीस करतो, रुळांच्या बाजूला पडलेले दगड, वेगाने मागे जाणारे खांब आणि मैलोन्मैल पसरलेले लोखंडी रूळ.

advertisement
2/7
पण तुमच्या मनात कधी हा प्रश्न आलाय का?आजच्या काळात जिथे घराबाहेर ठेवलेली सायकल किंवा साधी लोखंडी वस्तूही चोरीला जाते, तिथे हजारो किलोमीटरपर्यंत खुल्या मैदानात पसरलेले हे रेल्वेचे लोखंडी रूळ चोरी का होत नाहीत? या रुळांना ना कोणती भिंत आहे, ना 24 तास पहारा. तरीही चोर या पटऱ्यांकडे का फिरकत नाहीत? यामागे केवळ कडक कायदा नाही, तर काही रंजक तांत्रिक कारणंही आहेत.

3/7
1. लोखंड असूनही पटरी कापणं का अशक्य आहे?सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे रेल्वेचे रूळ हे शुद्ध लोखंडाचे नसतात. ते मँगनीज स्टील (Manganese Steel) नावाच्या एका मिश्र धातूपासून बनवलेले असतात. हा धातू इतका कडक आणि मजबूत असतो की, त्याला साध्या करवतीने किंवा घरगुती साधनांनी कापणं जवळपास असंभव आहे. पटऱ्या कापण्यासाठी अतिशय हाय-टेक मशिनरी लागते, जी चोर घेऊन फिरू शकत नाहीत.

4/7
2. स्लीपर्सचं मजबूत जाळंदुसरं कारण म्हणजे, हे रूळ जमिनीवर केवळ ठेवलेले नसतात. ते काँक्रीटच्या स्लीपर्सला अवजड नट-बोल्ट्स आणि फिश प्लेट्सच्या मदतीने अतिशय घट्ट बांधलेले असतात. ही बांधणी तोडण्यासाठी तासनतास मेहनत आणि मोठमोठी अवजड साधनं लागतात. रुळांचा एक छोटा तुकडाही इतका वजनदार असतो की, तो उचलून नेणं चोरांसाठी जीवावरचं काम ठरतं.

5/7
3. चोरलेली पटरी विकायची कुठे?समजा, एखाद्या व्यक्तीने जीवाचं रान करून पटरी चोरलीच, तरी त्याच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न असतो, विकायचा कुठे? रेल्वेच्या पटरीवर रेल्वेचे विशिष्ट मार्क असतात. एखादी पटरी चोरीला गेली, तर रेल्वे पोलीस (RPF) चोराच्या पाचवीला पूजलेले असतात. कोणताही भंगारवाला किंवा दुकानदार रेल्वेचं लोखंड विकत घेण्याचं धाडस करत नाही, कारण रेल्वेचं साहित्य जवळ बाळगणं हा अजामीनपात्र गुन्हा आहे. विकत घेणाऱ्यालाही वर्षानुवर्षे जेलची हवा खावी लागते.

6/7
रेल्वे ट्रॅकमधील दगडांचं काय काम?तुम्ही पाहिलं असेल की रुळांच्या मध्ये आणि बाजूला छोटे अणकुचीदार दगड पसरलेले असतात. हे केवळ सजावटीसाठी नसतात:
स्थिरता, हे दगड रुळांना जमिनीवर घट्ट धरून ठेवतात.
पावसाळ्यात रुळांवर पाणी साचू नये म्हणून हे दगड गाळणीसारखं काम करतात.
या दगडांमुळे रुळांच्या आसपास अनावश्यक गवत किंवा झाडं उगवत नाहीत.
भरधाव वेगात ट्रेन धावते तेव्हा होणारा आवाज आणि कंपन हे दगड शोषून घेतात.
रेल्वे ट्रॅकमधील दगडांचं काय काम?तुम्ही पाहिलं असेल की रुळांच्या मध्ये आणि बाजूला छोटे अणकुचीदार दगड पसरलेले असतात. हे केवळ सजावटीसाठी नसतात:स्थिरता, हे दगड रुळांना जमिनीवर घट्ट धरून ठेवतात.पावसाळ्यात रुळांवर पाणी साचू नये म्हणून हे दगड गाळणीसारखं काम करतात.या दगडांमुळे रुळांच्या आसपास अनावश्यक गवत किंवा झाडं उगवत नाहीत.भरधाव वेगात ट्रेन धावते तेव्हा होणारा आवाज आणि कंपन हे दगड शोषून घेतात.
advertisement
7/7
भारतीय रेल्वेबद्दल काही रंजक गोष्टीहे असं एक अनोखं स्टेशन आहे ज्याचा अर्धा भाग महाराष्ट्रात तर अर्धा गुजरातमध्ये आहे. मेट्टुपालयम-ऊटी नीलगिरी पॅसेंजर ही ट्रेन केवळ 10 किमी/तास या वेगाने धावते. म्हणजे तुम्ही चालत गेलात तरी या ट्रेनला गाठू शकाल. रेल्वेची सुरक्षितता केवळ पोलिसांच्या हातात नाही, तर ती पटरीच्या तांत्रिक रचनेतही दडलेली आहे. त्यामुळेच कित्येक दशकांपासून हे रूळ देशाच्या कानाकोपऱ्यात सुरक्षितपणे पसरलेले आहेत.

Nagar Parishad Election : ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षानं मैदान मारलं
ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा
  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

View All
advertisement