आनंदाची बातमी! देशाची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांच्या सेवेसाठी तयार; पाहा यात काय-काय सुविधा

Last Updated:
Vande Bharat Sleeper Train : कोलकाता ते गुवाहाटी दरम्यान देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन 17 जानेवारीपासून सुरू होत आहे. अत्याधुनिक सुविधा ताशी 180 किमी वेग आणि वाजवी भाड्यामुळे ही ट्रेन प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
1/8
प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आजपासून देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता ते गुवाहाटी दरम्यान धावणार आहे. चला तर या ट्रेनमध्ये का विशेष सुविधा आहे याबाबतही माहिती करुन घेऊयात.

advertisement
2/8
नवी वंदे भारत स्लीपर ही ट्रेन आठवड्यातील सहा दिवस हावडा जंक्शन ते कामाख्या दरम्यान धावणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन ही सेमी-हाय-स्पीड ट्रेन असून तिचा डिझाइन वेग ताशी 180 किलोमीटर आहे. ही ट्रेन लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासासाठी खास डिझाइन करण्यात आली आहे. या ट्रेनमुळे कोलकाता आणि गुवाहाटी दरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.

3/8
या ट्रेनमध्ये एकूण 16 डबे असतील,त्यामध्ये 11 थर्ड एसी, 4 सेकंड एसी आणि 1 फर्स्ट एसी डबा असणार आहे. एकूण 823 प्रवासी या ट्रेनमधून प्रवास करू शकतील. सामान्य प्रवाशांना परवडणारी तिकिटे मिळावीत यासाठी थर्ड एसी कोचची संख्या अधिक ठेवण्यात आली आहे.

4/8
कोलकाता- गुवाहाटी वंदे भारत स्लीपर ट्रेनचे भाडे प्रवाशांना परवडणारे ठेवण्यात आले आहे. थर्ड एसीचे भाडे 2,३०० रुपये, 2एसीचे 3,000 रुपये तर 1 फर्स्ट एसीचे भाडे 3,600 रुपये निश्चित करण्यात आले आहे.

5/8
- या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. मऊ आणि आरामदायी बर्थ, डब्यांमधील ऑटोमॅटिक दरवाजे, वेस्टिब्युल्स, सुधारित सस्पेंशन आणि कमी आवाजामुळे प्रवास सुखद होणार आहे. स्वच्छतेसाठी जंतुनाशक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

6/8
सुरक्षिततेच्या दृष्टीने ट्रेनमध्ये आर्मर प्रोटेक्शन सिस्टम आणि आपत्कालीन टॉक-बॅक सिस्टम देण्यात आली आहे. लोको पायलटसाठी अत्याधुनिक कंट्रोल आणि सुरक्षा प्रणालीसह आधुनिक ड्रायव्हर केबिन उपलब्ध आहे. ट्रेनचा बाह्य भाग आकर्षक आणि एरोडायनामिक असून ऑटोमॅटिक बाह्य दरवाजे देण्यात आले आहेत

7/8
विशेष गोष्ट म्हणजे गुवाहाटीहून येणाऱ्या ट्रेनमध्ये आसामी भोजन तर कोलकाताहून येणाऱ्या ट्रेनमध्ये बंगाली भोजन प्रवाशांना दिले जाणार आहे. या सर्व सुविधांचा विचार करता ट्रेनचे भाडे वाजवी असल्याचे मानले जात आहे.

8/8
 दरम्यान रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली की पुढील सहा महिन्यांत 8 वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होतील. वर्षअखेरपर्यंत 12 गाड्या सुरू करण्याचे नियोजन असून भविष्यात 200 वंदे भारत स्लीपर ट्रेन देशभरात धावणार आहेत शिवाय महाराष्ट्रातही लवकर ही सेवा सुरु होणार आहे.

Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement