Independence: स्वातंत्र्य लढ्याचे ऐतिहासिक साक्षीदार, मुंबईतील 5 ठिकाणं तुम्हाला माहितीये का?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Independence Day: मुंबई शहर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अनेक संघर्षक्षणांचं साक्षीदार राहिलं आहे. यातील ऐतिहासिक ठिकाणांबाबत जाणून घेऊ.
15 ऑगस्ट 2025 रोजी भारत आपला 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. स्वातंत्र्यलढ्यात मुंबईचं स्थान अत्यंत मध्यवर्ती राहिलं. इथल्या रस्त्यांवर, मैदानांवर, ग्रंथालयांच्या पायऱ्यांवर आणि गल्ल्यांमधून चळवळी पेटल्या, सभा जमल्या, गुप्त बैठकी झाल्या. या पार्श्वभूमीवर मुंबईतील काही ठिकाणं आजही स्वातंत्र्यसंग्रामाची जिवंत स्मृती जपून आहेत. त्यात गेटवे ऑफ इंडिया, आझाद मैदान, अलिबाग (कोकणातील दुवा), एशियाटिक लायब्ररी आणि नेपियन सी रोडवरील ‘लक्ष्मी निवास’ या ठिकाणांचा विशेष उल्लेख होतो.
advertisement
मुंबईच्या अपोलो बंडर भागात स्थित गेटवे ऑफ इंडिया हे केवळ वास्तुकलेचे प्रतीक नसून, स्वातंत्र्याच्या इतिहासातही याला विशेष महत्त्व आहे. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिश अधिकारी आणि सैन्य जवळपास एक वर्ष भारतात राहून कामकाज पूर्ण करत होते. महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करणे, प्रशासनातील जबाबदाऱ्या हस्तांतरित करणे अशा प्रक्रियांनंतर, 28 फेब्रुवारी 1948 रोजी ब्रिटिश सैन्याने मुंबईतून निघताना गेटवे ऑफ इंडियावरून औपचारिक निरोप घेतला. त्यामुळे हे ठिकाण भारतातील ब्रिटिश राजवटीच्या अखेरचे प्रतीक ठरले आहे.
advertisement
क्रॉस मैदानाजवळ असलेले आझाद मैदान हे ब्रिटिश काळापासून लोकसभा, निदर्शने, आणि आंदोलनांचे केंद्र राहिले आहे. ‘आझाद’ या नावालाच स्वातंत्र्याचा अर्थ असल्याने, या मैदानाने अनेक राजकीय चळवळींची साक्ष दिली आहे. येथे विविध नेत्यांच्या सभा झाल्या, स्वातंत्र्यसैनिकांनी लोकांना एकत्र आणले, आणि जनतेच्या मागण्यांसाठी ठाम आवाज उठवला. आजही हे मैदान आंदोलन, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे.
advertisement
मुंबईपासून समुद्रमार्गे जवळ असलेल्या अलिबागमधील पार्क लेन येथे महात्मा गांधी वास्तव्यास असत. येथे ते त्यांच्या सुप्रसिद्ध ‘यंग इंडिया’ या वृत्तपत्राचे संपादन करत असत. या वृत्तपत्रातून गांधीजींनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध आपले विचार मांडले आणि सत्याग्रहाचा संदेश संपूर्ण देशभर पोहोचवला. अलिबागमधील हा काळ गांधीजींच्या पत्रकारितेच्या आणि विचारप्रसाराच्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला.
advertisement
फोर्ट परिसरातील हॉर्निमन सर्कल येथे स्थित एशियाटिक सोसायटी लायब्ररी हा ऐतिहासिक दस्तऐवजांचा खजिना आहे. ब्रिटिश काळात येथे दुर्मीळ पुस्तके, सरकारी अहवाल, आणि ऐतिहासिक कागदपत्रांचा संग्रह करण्यात आला. स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, आणि अभ्यासकांनी येथे अभ्यास करून स्वातंत्र्यलढ्याला बळकटी देणारी माहिती मिळवली. आजही ही लायब्ररी संशोधकांसाठी अमूल्य ठेवा आहे.
advertisement
मुंबईच्या नेपियन सी रोडवर असलेला लक्ष्मी निवास बंगला हा स्वातंत्र्य इतिहासातील एक महत्त्वाचा पत्ता आहे. या बंगल्यात स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित गुप्त बैठका आणि महत्त्वाचे राजकीय चर्चासत्रे होत असत. येथे घेतलेल्या निर्णयांचा थेट परिणाम स्वातंत्र्य संग्रामातील धोरणांवर झाला. आज हे ठिकाण जरी खासगी मालकीचे असले तरी त्याच्या भिंतींमध्ये त्या काळातील अनेक ऐतिहासिक आठवणी दडलेल्या आहेत.
advertisement
काळबादेवी हा मुंबईतील सर्वात जुन्या व्यापारी भागांपैकी एक असून, स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात येथे अनेक गुप्त बैठकांचे आयोजन होत असे. त्यापैकी कोठारी हवेली हे ठिकाण विशेष महत्त्वाचे होते. व्यापारी व सामाजिक नेत्यांच्या मदतीने येथे स्वातंत्र्यसैनिकांसाठी निधी गोळा करणे, गुप्त संदेशांची देवाणघेवाण करणे आणि ब्रिटिशांविरुद्धच्या आंदोलनांची आखणी करणे यांसारखे कार्य होत असे. गर्दीच्या बाजारपेठेत असूनही या हवेलीने ब्रिटिशांच्या नजरेआड राहून चळवळीला बळ पुरवले.


