Weather Alert: नोव्हेंबर अखेर सूर्याला ताप, कोकणात वारं फिरलं, मुंबई-ठाण्यातील आजचं हवामान अपडेट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: नोव्हेंबर अखेर कोकणातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मुंबई-ठाणेकरांना देखील ऐन थंडीत उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
कोकण किनारपट्टीवर गेल्या काही दिवसांत जाणवत असलेली थंडी आता आणखी कमी झालेली दिसते. सकाळच्या वेळी पूर्वीसारखी गार हवा राहिलेली नाही, उलट वातावरणात उकाडा जाणवतोय. दिवसा तापमानात 1–2 अंशांनी वाढ होत असून कोणत्याही भागात तापमान घसरल्याचं दिसत नाही. हवा कोरडी असून मुंबईसह कोकणातील आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्येही तापमान वाढतेच आहे. किमान तापमान 21–22°C असून यात घट झालेली नाही, तर कमाल तापमान 32–33°C पर्यंत जाईल. समुद्रकिनारी सकाळचा हलका गारवा सोडला तर उरलेला दिवस स्पष्टपणे उष्णतेकडे झुकलेला राहणार आहे. म्हणजेच दक्षिण कोकणातही तापमानात कुठलीही घट नसून वाढच दिसते आहे.







