Weather Alert: बाप्पाच्या आगमनाला धो धो पाऊस, मुंबई-ठाण्याला यलो अलर्ट, 27 ऑगस्टचा हवामान अंदाज

Last Updated:
Mumbai Rain: कोकणात गणपती बाप्पाच्या आगमाना दिवशीच पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
1/5
आज 27 ऑगस्ट 2025, गणपती बाप्पाच्या आगमनाचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होत आहे. मात्र, या आनंद सोहळ्या दिवशीच पावसाचा जोर राहणार आहे. आज पहाटेपासूनच मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजही कोकणातील सर्व महत्त्वाच्या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

advertisement
2/5
मुंबईत सकाळपासूनच रिमझिम सरी बरसत आहेत. वातावरण ढगाळ असून दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरींचा अनुभव येणार आहे. दुपारनंतर काही भागात मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. गणपतीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान रस्त्यांवर गर्दी अपेक्षित असल्याने नागरिकांनी छत्री, रेनकोट आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाचे आवाहन आहे.

3/5
ठाणे व नवी मुंबई परिसरातही सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. दिवस जसजसा पुढे सरकेल, तसतसे काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या भागांसाठीही यलो अलर्ट दिला असून, विशेषतः सायंकाळी मिरवणुकांदरम्यान नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

4/5
पालघर जिल्ह्यातही हवामान ढगाळ राहणार असून, हलक्या सरी सकाळपासूनच सुरु आहेत. काही गावांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. समुद्रकिनाऱ्यावरील भागात जोरदार वाऱ्यासह सरींचा अनुभव येऊ शकतो. मच्छीमार बांधवांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

5/5
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सकाळपासून रिमझिम पावसाच्या सरी पडत आहेत. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी कोकणात थोडा थोडा पाऊस पडत राहणार असून काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो. डोंगराळ भागात आणि नदीनाल्यांजवळ राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement