Weather Alert: दिवाळीआधी बदलली हवा, कोकणसाठी इशारा नवा, मुंबई-ठाण्यातून महत्त्वाचं अपडेट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरला असून हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कोकणसह मुंबई-ठाण्याचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
1/5
गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम होता. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सलग दोन ते तीन दिवस पावसाने चांगलाच जोर धरला होता. मात्र, आज म्हणजेच 10 ऑक्टोबर 2025 रोजी हवामानाने अखेर विश्रांती घेतली आहे. कोकणात सर्वत्र वातावरण स्थिर आहे आणि सध्या कोणत्याही जिल्ह्याला हवामान खात्याने अलर्ट जारी केलेला नाही.

advertisement
2/5
मुंबईत आज हवामान शांत असून दिवसभर आंशिक ढगाळ वातावरण राहील. हलक्या सरींची शक्यता अत्यल्प असून दिवसभर आभाळ भरलेले राहू शकते. तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. दमट वातावरणामुळे थोडासा उकाडा जाणवेल, पण पावसाचा जोर कमी झाल्याने वाहतुकीत अडथळे येणार नाहीत.

3/5
ठाणे आणि नवी मुंबई परिसरात गेल्या काही दिवसांत अधूनमधून जोरदार पाऊस झाला होता, मात्र आता पावसाने विश्रांती घेतली आहे. आज या भागात आकाश अंशतः ढगाळ असेल आणि हवामान तुलनेने कोरडे राहील. काही ठिकाणी दुपारनंतर हलक्या रिमझिम सरी पडू शकतात. तापमान 28 ते 30 अंशांच्या दरम्यान राहील.

4/5
पालघर जिल्ह्यातही आज हवामान स्थिर असून ग्रामीण भागांत सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. पावसाची तीव्रता कमी झाली असून दिवसभर वातावरण कोरडे राहील. तापमान 26 ते 30 अंशांच्या दरम्यान राहणार आहे. दमट हवा आणि उकाडा थोडासा जाणवेल.

5/5
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही किनारपट्टी भागांत गेल्या काही दिवसांत अधूनमधून पावसाने हजेरी लावली होती. मात्र आज हवामान शांत आहे. समुद्रकिनाऱ्यावर सौम्य वारे वाहतील आणि हवामान सुखद राहील. कुठेही मुसळधार पावसाचा इशारा नाही. काही ठिकाणी हलका पाऊस पडेल, पण एकूणच दिवस काहीसा उष्ण आणि दमट हवामानाचा राहील.

Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement