Weather Alert: कोकणात पुन्हा पाऊस, 48 तास महत्त्वाचे, मुंबई-ठाण्यातून मोठं अपडेट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: कोकणातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. काही जिल्ह्यांत पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. मुंबई, ठाण्यातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
गेल्या दोन–तीन दिवसांत कोकणपट्टीवर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी झाल्या तर काही भागांत पूर्ण विश्रांती होती. पण आज पुन्हा हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना कोणताही अलर्ट जारी केलेला नाही, मात्र या भागांत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
मुंबईत आज वातावरण अंशतः ढगाळ राहील. अधूनमधून रिमझिम सरी बरसण्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांतील पावसाने दिलासा मिळाल्यानंतर आज मुसळधार पावसाचा धोका नाही. ठाणे व नवी मुंबई परिसरातही हवामान दमट राहील आणि हलक्या सरींचा अंदाज वर्तवला आहे. तापमान कमाल 30 अंश सेल्सिअस आणि किमान 25 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
रायगड व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना आज हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. मागील काही दिवसांपासून इथे पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी मुसळधार सरी झाल्या आहेत. आजही काही भागांत जोरदार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणकिनारी राहणाऱ्यांनी खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. कमाल तापमान सरासरी 28–29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 24–25 अंश सेल्सिअस राहील.
advertisement







