सुरमई फ्राय ते पुरण पोळी, खासदार-आमदारांना स्पेशल चांदीची थाळी, शाही उधळपट्टीचे PHOTOS
- Published by:sachin Salve
Last Updated:
मेजवानीसाठी वापरण्यात आलेल्या एका ताटाचं दिवसाचं भाडं तब्बल 550 रुपये तर एका थाळीचा दर चार हजार रुपये.अंदाज समितीचे अध्यक्ष आणि 250 सदस्य शिवाय 350 अधिकारी अशा एकूण सहाशे अतिथींनी या मेजवानीवर ताव हाणला.
सोमवारी विधानसभेत एक कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम होता संसद आणि राज्य विधिमंडळाच्या अंदाज समितीचा. पण या कार्यकर्मात काय घडलं यापेक्षा जास्त चर्चा रंगलीये ती कार्यक्रमाच्या निमित्तानं रंगलेल्या मेजवानीची. कारण मंडळी ही मेजवानी काही साधी-सुधी नव्हती. या मेजवानीसाठी चक्क चांदीच्या ताटांचा थाट मांडला गेला. इतकंच नाही तर प्रत्येक ताटामागे पाच हजार रुपये खर्च केले गेले. त्यामुळे एकीकडे राज्याच्या तिजोरीतल्या खडखडाटाची चर्चा रंगत असताना विनाकारण उधळपट्टीची गरज काय असा सवाल उपस्थित होऊ लागलाय.
advertisement
advertisement
निमित्त होतं संसद आणि राज्य विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी आयोजित मेजवानीचं. या मेजवानीसाठी वापरण्यात आलेल्या एका ताटाचं दिवसाचं भाडं तब्बल 550 रुपये...तर एका थाळीचा दर चार हजार रुपये. अंदाज समितीचे अध्यक्ष आणि 250 सदस्य शिवाय 350 अधिकारी अशा एकूण सहाशे अतिथींनी या मेजवानीवर ताव हाणला..
advertisement
advertisement
तर काही दिवसांपूर्वी धुळ्यात विधीमंडळ अंदाज समिती दौऱ्यावर आली होती. यावेळी शासकीय विश्रामगृहाच्या खोलीत पाच कोटी असल्याचा आरोप अनिल गोटेंनी केला होता. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत एक कोटी ८४ लाखांची रोकड आढळून आली होती. त्या प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणाही राज्य सरकारनं केली. विधीमंडळाच्या अंदाज समितीतीतील शाही मेजवानीवरून विरोधकांनी निशाणा साधला.
advertisement
संसदेच्या आणि विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या केवळ जेवणावरचं नाही तर त्यांच्या राहण्या फिरवण्यावर मुक्तहस्ते खर्च करण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष पाहुण्यांच्या निवासाची सोय हॉटेल ताज पॅलेस, तर त्यांच्यासोबतच्या अधिकाऱ्यांची हॉटेल ट्रायडंटला करण्यात आली होती. तसंच परिषद संपल्यानंतर मुंबई सहलचंही आयोजन करण्यात आलं होतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement