Mini Dwarka: मुंबईजवळ वसली आहे 'मिनी द्वारका'; तुम्ही भेट दिली का? कुठे आणि कसं जायचं इथं
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Mini Dwarka In Virar: अलीकडेच विरारमध्ये एका प्रसिद्ध मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. विरारमध्ये गुजरातच्या द्वारकाधिश मंदीराची निर्मिती करण्यात आली आहे. अलीकडेच या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याला फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर परराज्यातूनही अनेक लोकं आले होते.
अनेकदा जनसामान्य लोकांना तीर्थस्थळांचं दर्शन घेण्यासाठी जायला शक्य होत नाही. त्यामुळे देशभरामध्ये अनेक ठिकाणी प्रती स्थळांचं प्रमाण जास्त आहे. अशातच आता विरारमध्ये एका प्रसिद्ध मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. विरारमध्ये द्वारकाधिश मंदीराची निर्मिती करण्यात आली आहे. अलीकडेच या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याला फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर परराज्यातूनही अनेक लोकं आले होते.
advertisement
विरारमध्ये गुजरातमधील द्वारकाधिश मंदिराची हुबेहुब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. याची उंची 90 फूट इतकी आहे. मंदिरातील मुर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा अलीकडेच पार पडला. मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आद्यगुरू शंकराचार्य यांच्या हस्ते करण्यात आला. सध्या या मंदिराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
advertisement
मंदिराच्या बांधकामाविषयी सांगायचे तर, मंदिराचं बांधकाम नागरशैली, लोखंडी सळई किंवा इतरत्र साचे वापरून केलेले नाहीत. फक्त बन्सी पहारपूर दगडांचा वापर करून या मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. द्वारका मंदिरामध्ये ज्या प्रमाणे 56 पायऱ्या आहेत, तशाच पायऱ्या या मंदिराला सुद्धा आहेत. मंदिरावर जो फडकणारा ध्वज आहे, तो 52 गजांचा ध्वज इथल्या मंदिरातही फडकवण्यात आला आहे.
advertisement
ही 52 फूट गजा द्वारकाधिश मंदिराच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये श्रीकृष्णाच्या मुर्तीची मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला गणपतीची मुर्ती आणि डाव्या बाजूला एकविरा देवीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मंदिरातील खांब्यांवर भागवत ग्रंथांतील श्रीकृष्णाचे 24 अवतार तुम्हाला पाहायला मिळतील.
advertisement
यासोबतच मंदिराच्या खांब्यावर नवग्रहदेवता आणि लीलांचे 18 प्रसंग असे दृश्य पाहायला मिळतील, असे शिल्प पाहायला मिळतील. या परिसरात एक गरूड स्तंभ देखील आहे, तो सुद्धा भाविकांचा एक आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरत आहे. गोवर्धन पर्वताची प्रतिकृती, भगवंताचे 108 नावे आणि प्रदक्षिणा मार्ग या सारख्या सुविधा भाविकांना इथे पाहायला मिळेल.
advertisement
केव्हाही न पाहिलेली आणि न वाचलेली माहिती भाविकांना इथे पाहायला मिळेल. गेल्या 7 ते 8 वर्षांपासून या मंदिराच्या बांधकामाचे काम सुरू आहे. अखेर 2025 च्या शेवटी हे काम संपलं असून अखेर याची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे. 26 नोव्हेंबर 2025 रोजी, आद्यगुरू शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांच्या हस्ते मंदिराचे द्वार उघडण्यात आले आहे. वसई- विरारमधील हे मंदिर असून एक प्रकारे ऐतिहासिक मंदिरांपैकी एक आहे. विरार रेल्वे स्थानकावरून तुम्ही या मंदिराकडे येऊ शकता.


