advertisement

रद्दी पेपरपासून 'त्यानं' केल्या बाप्पांसाठी खास वस्तू, संपूर्ण मुंबईतून आहे मागणी

Last Updated:
या तरुणाने रद्दीच्या पेपरपासून 100 पेक्षा जास्त वस्तू तयार केल्यात. गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी लागणाऱ्या वस्तूंचाही यामध्ये समावेश आहे.
1/8
आपण आपल्या घरातला जुना पेपर कचऱ्यात किंवा रद्दीत टाकतो. मात्र, कलाकार मंडळी याच रद्दीच्या पेपरमधून पुन्हा नव्या वस्तू तयार करु शकतात.

2/8
 <a href="https://news18marathi.com/mumbai/">मुंबईत</a> राहणाऱ्या सर्वेश कीर या तरुणाने रद्दीच्या पेपरपासून 100 पेक्षा जास्त वस्तू तयार केल्यात. गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी लागणाऱ्या वस्तूंचाही यामध्ये समावेश आहे.
मुंबईत राहणाऱ्या सर्वेश कीर या तरुणाने रद्दीच्या पेपरपासून 100 पेक्षा जास्त वस्तू तयार केल्यात. गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी लागणाऱ्या वस्तूंचाही यामध्ये समावेश आहे.
advertisement
3/8
वरळीच्या रहेजा कॉलेज मधून शिक्षण घेतलेला सर्वेश गेल्या आठ वर्षांपासून रद्दी पेपर, कार्डबोर्ड पासून वेगवगेळ्या कलाकृती तयार करत आहे. अभ्यासातून रिकामा वेळ मिळाला की पेपरपासून कलाकृती तयार करण्याचे काम सर्वेश करत होता.

4/8
सुरुवातीला त्याने टूथपेस्टच्या रिकाम्या बॉक्स पासून ट्रक आणि हेलिकॉप्टर तयार केले. त्याच्या या कलेचं अनेकांनी कौतुक केलं. या कौतुकानं सर्वेचा आत्मविश्वास वाढवला. त्यानं आणखी प्रयोग केले.

5/8
पीओपीच्या तुलनेत पेपरपासून तयार केलेल्या वस्तू वजनाने हलक्या असतात. त्यामुळे दक्षिण मुंबईतील काही मूर्तिकार सर्वेशकडून बाप्पाच्या मूर्तीसाठी लागणारे डेकोरेशन, हातातील शस्त्र, वाद्य तयार करून घेतात.

6/8
मी 2011 पासून पेपर आर्ट क्षेत्रात काम करत आहे. माझ्या इमारतीत राहणाऱ्या एका मूर्तिकारांच्या कारखान्यात जाऊन मी त्यांना गणपतीसाठी शस्त्र तयार करू शकतो का? अशी विचारणा केली. त्यांनी परवानगी दिल्यानंतर मी या कामाला सुरूवात केली.

7/8
मी 2015 पासून गणेशोत्सवातले शस्त्र बनवण्याच्या कामास सुरूवात केली. गेल्या आठ वर्षांपासून मी हे काम करत आहे. एका फुटापासून ते 20 ते 25 फुटांच्या मूर्तीपर्यंती शस्त्र कागदाने तयार करतो, असं सर्वेशनं सांगितलं.

8/8
मी तयार केलेली शस्त्र पर्यावरणाला पूरक आहेत. त्याचबरोबर टाकाऊ वस्तूंपासून केली आहेत. शंख, त्रिशूल, गदा असे वेगवेगळे शस्त्र मी तयार केले आहेत. याची किमान किंमत 200 रुपये आहे. ही शस्त्र ग्राहकांना आवडत असून गेल्या 2 वर्षांमध्ये याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलीय, अशी माहिती सर्वेशनं दिली.

बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?

  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement