advertisement

भारतवर 1000 किमी लांबीच्या ढगांचा वेढा, पुढचे 4 दिवस धोक्याचे; सॅटेलाइट फोटोने धडकी भरली, 10 राज्यांमध्ये 'यलो अलर्ट'

Last Updated:

India Pakistan Weather: उत्तर-पश्चिम भारतात सक्रिय झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस, वादळी वारे आणि गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही दिवस हवामान अस्थिर राहणार असून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

News18
News18
नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) शेअर केलेल्या उपग्रह चित्रांनुसार शुक्रवारी उत्तर-पश्चिम भारत आणि पाकिस्तानच्या वर सुमारे 1,000 किमी लांबीचा ढगांचा पट्टा तयार झाला असून या भागात पावसाची शक्यता वाढली आहे.
पूर्व इराण आणि लगतच्या अफगाणिस्तान भागावर गुरुवारपासून सक्रिय असलेला ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ (पश्चिमी विक्षोभ), त्यासोबत पूर्व राजस्थानवर निर्माण झालेली वरच्या हवेतील चक्रीय स्थिती (upper air cyclonic circulation) आणि पूर्व राजस्थानपासून पूर्व-मध्य अरबी समुद्रापर्यंत पसरलेली द्रोणिका (trough) यामुळे हवामान अस्थिर होण्याची शक्यता आहे.
हा महत्त्वाचा हवामान बदल पूर्वेकडे सरकत असून त्यामुळे उत्तर-पश्चिमेकडील बहुतांश राज्यांमध्ये पाऊस, मेघगर्जना आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. यामध्ये जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.
advertisement
शनिवारपर्यंत या पावसाचा प्रभाव उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडपर्यंत पसरण्याचा अंदाज आहे. या सर्व राज्यांमध्ये 8 एप्रिलपर्यंत विविध दिवशी पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा प्रभाव कायम राहू शकतो.
1,000-km Cloud Band Over India, Pak: What It Means For Weather This Weekend
दरम्यान पूर्व झारखंडपासून दक्षिण छत्तीसगडपर्यंत पसरलेल्या आणखी एका द्रोणिकेमुळेही वातावरणात अस्थिरता निर्माण होत आहे. तसेच 7 एप्रिलपासून आणखी एक नवीन ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ उत्तर-पश्चिम भारतावर परिणाम करणार असल्याची शक्यता आहे.
advertisement
या हवामान बदलामुळे वाढत्या तापमानापासून काहीसा दिलासा मिळेल. मात्र उभ्या पिकांवर परिणाम होऊ शकतो म्हणून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान दिल्ली आणि आसपासच्या भागात हवामानात अचानक बदल दिसून येत आहे. शहरावर धुळीचे दाट आवरण पसरले असून वातावरण धूसर झाले आहे. IMD च्या सकाळच्या बुलेटिननुसार पुढील 24 तासांत दिल्ली आणि एनसीआर भागात 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
advertisement
दिल्ली-एनसीआरमध्ये विकेंडपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी सुरू राहण्याची शक्यता आहे. IMD ने शनिवारी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून दुपार ते संध्याकाळदरम्यान हलका पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि 20 ते 30 किमी प्रतितास वेगाने वारे (कधी कधी 40 किमी प्रतितासपर्यंत) वाहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
तसेच भोपाळ येथील हवामान केंद्राने इशारा दिला आहे की 5 एप्रिलपर्यंत मध्य प्रदेशातील अनेक भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
भारतवर 1000 किमी लांबीच्या ढगांचा वेढा, पुढचे 4 दिवस धोक्याचे; सॅटेलाइट फोटोने धडकी भरली, 10 राज्यांमध्ये 'यलो अलर्ट'
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement