Mumbai Weather: कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, मुंबईत काय स्थिती? पाहा आजचं हवामान
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
या भागांमध्ये हवामान ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही भागांत वाऱ्याचा वेग वाढण्याची व विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
29 जून 2025 रोजी संपूर्ण कोकण किनारपट्टीसह मुंबई, पालघर, ठाणे आणि नवी मुंबई या भागांमध्ये हवामान ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही भागांत वाऱ्याचा वेग वाढण्याची व विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
advertisement
advertisement
कोकण किनारपट्टीवरील महत्वाचा जिल्हा म्हणजे पालघर. गेली 3 ते 4 दिवस पालघरमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय.तर आजही पालघर जिल्ह्यात ढगाळ वातावरणासोबत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही भागांत संध्याकाळी पावसाचा जोर वाढू शकतो. तापमान 26 अंश सेल्सिअस ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. नागरिकांनी सखल भागात प्रवास करताना काळजी घ्यावी.
advertisement
आज मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक आहे. त्यामुळे इथल्या गाड्या उशिराने धावतील पण तरीही आज घराबाहेर निघताना पावसाचा अंदाज लक्षात घेणं महत्वाच आहे. आज ठाणे आणि नवी मुंबईमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. सकाळी तुरळक सरी पडण्याची शक्यता असून, दुपारनंतर काही भागांत पावसाचा जोर थोडा वाढू शकतो. विजांच्या कडकडाटाचा संभव आहे. तापमान 27 अंश सेल्सिअस ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
advertisement