Mumbai Rain: मुंबईसह कोकणात हवापालट, पुन्हा धो धो की आज उघडीप, 11 जुलैचा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Rain: महाराष्ट्रातील कोकणात गेल्या काही काळात जोरदार पाऊस सुरू आहे. आता मात्र हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत मान्सूनने जोरदार हजेरी लावली. कोकणसह, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरू होता. आता मात्र कोकणात काहीशी उघडीप दिली आहे. आज मुंबई, ठाण्यास कोकणात पावसाचा जोर कमी राहणार आहे. आज तुरळक पावसाची शक्यता असून कुठेही सतर्कतेचा अलर्ट दिलेला नाही. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. मध्यवर्ती व पश्चिम उपनगरांमध्ये सकाळी काही भागांत हलक्याप्रमाणात पावसाच्या सरी पडल्या आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दुपारी आणि संध्याकाळी देखील हलक्या पावसाची शक्यता असून, काही भागांत विजांच्या कडकडाटासह सरी पडू शकतात. सखल भागांत पाणी साचण्याचा संभव असल्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. शहराचे तापमान 27 ते 30 अंश सेल्सियस दरम्यान राहणार आहे.
advertisement
ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही सकाळपासूनच ढगाळ हवामान असून, हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या आहेत. हवामान विभागाने दुपारनंतर काही भागांत मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. रस्ते वरील वाहतूक काही ठिकाणी धीम्या गतीने सुरू असून, नागरिकांनी अपवादात्मक परिस्थितीत घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भागात तापमान सुमारे 26 ते 29 अंश सेल्सियस राहणार आहे.
advertisement
पालघर जिल्ह्यात आज सकाळीच काही भागांत जोरदार सरी पडल्या आहेत. दिवसाच्या पुढील कालावधीतही मध्यम ते काही प्रमाणात जोरदार पावसाची शक्यता आहे. समुद्रकिनाऱ्यालगत वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे किनारी भागातील नागरिक व मच्छीमारांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. येथील तापमान सरासरी 25 ते 28 अंश सेल्सियस दरम्यान राहील.
advertisement
कोकणातील रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरण असून, सकाळपासून हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, दुपारनंतर काही भागांत जोरदार पावसाच्या शक्यता वर्तविण्यात आल्या आहेत. वाऱ्याचा वेग वाढण्याचा अंदाज असल्यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. कोकणात सरासरी तापमान 24 ते 28 अंश सेल्सियस राहणार आहे.