डौलदार चाल, दिसायला देखणा! पाहताच प्रेमात पडाल असा शाहबाज; कोण आहे हा?

Last Updated:
राजस्थानच्या मेळाव्यात शाहबाज या घोड्याची 9 कोटींची बोली लागली असून मालक गैर गिल 15 कोटींची मागणी करत आहेत. शाहबाजने 4 चॅम्पिनयशिप जिंकली आहे. दबंग, भारत ध्वज चर्चेत.
1/6
रुबाबदार आणि दिसायला देखणा, पाहताच क्षणी डोळ्यात भरावा असा हा शाहबाज... कुणाचीही नजर नको लागायला असं त्याला पाहून म्हणावं वाटेल. आहाहा काय सुंदर कान, झुपकेदार केस आणि अंगावरची चमक तर अशी की पाहूनच प्रेमात पडाल. पाहताच क्षणी मनाला भुरळ घालणाऱ्या या शाहबाजची सध्या चर्चा मात्र जोरदार सुरू आहे.

advertisement
2/6
आतापर्यंत याला घेऊन जाण्यासाठी 9 कोटी रुपयांची बोली लागली आहे. पण त्याला मालक काही त्याला सोडायला तयार नाही. शाहबाज हा चौथ्या पिढीतला असल्याचं त्याच्या मालकाने सांगितलं. त्याच्या म्हणण्यांनुसार 15 कोटी रुपये फायनल रक्कम आहे. ते कुणी देत असेल तर शाहबाजला देण्याचा विचार करु असा दावा त्यांना केला आहे. - फोटो सौजन्य - ANI

3/6
याची मागणीच एवढी आहे की त्याच्यापासून जर पिल्लू हवं असेल तर मालकच किमान दोन ते तीन लाख रुपये फी एका घोडीसोबतच्या भेटीचे घेतो. आतापर्यंत त्याने 4 वेळा चॅम्पिनयशिप मारली असल्याचंही मालकाने सांगितलं आहे. ते सगळं असलं तरी राजस्थानच्या मेळाव्यात चर्चा मात्र या शाहबाजची आहे.

4/6
65 इंच उंची, लांब भारदस्त शरीर, काळा रंग आणि अंगावर एक वेगळीच चमक त्याचा असलेला रुबाब यावरच तिथे आलेले लोक भाळले. उंट आणि घोड्यांच्या या मेळाव्यात मात्र शाहबाजने बाजीही मारली आणि मैदानही अशी गत झाली आहे. जो तो येतो तो त्याला पाहून जात आहे.

5/6
मर्सिडीज, BMW पेक्षाही या घोड्याची किंमत जास्त आहे. त्याला घडवण्यासाठी अपार मेहनत घेतल्याचं सांगितलं. हा आमच्यासाठी घोडा नाही प्रेम आणि अभिमान आहे असंही मालक गैर गिल यांनी सांगितलं.

6/6
यासोबत दबंग, भारत ध्वज, नागेश्वर यासारख्या घोड्यांची देखील चर्चा होत आहे. ब्रिडिंगसाठी देखील त्याच्याकडे खूप गर्दी असल्याची चर्चा आहे. अशा या शाहबाजने यावेळी मेळाव्यात चांगलाच भाव खाल्ला आहे. सोशल मीडियावरही त्याचीच चर्चा सुरू आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement