photos : भारताच्या या गावात संविधान लागू होत नाही, कुठे आहे हे गाव?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. या देशामध्ये संविधानाचे विशेष महत्त्व आहे. भारतातील प्रत्येक जागा ही संविधानाच्या कक्षेत येते. मात्र, तुम्हाला वाचून आश्चर्य होईल, भारतात एक गाव असं आहे, ज्याठिकाणी संविधान लागू होत नाही. येथे भारतीय कायद्याचे कोणतेही कलम पाळले जात नाही. हे गाव नेमकं कोणतं आहे, हे जाणून घेऊयात.
या गावाची स्वतःची स्वतंत्र घटना आहे. न्यायपालिका आणि कार्यपालिका वेगळी आहे. हे गाव हिमाचल प्रदेशात आहे. या गावाचे नाव मलाणा असे आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील दुर्गम भागात हे गाव आहे. कुल्लूपासून 45 किमी अंतरावर हे गाव आहे. याठिकाणी यायला मणिकर्ण रूटच्या माध्यमातून कसोलच्या मार्गाने मलाणा हाइड्रोइलेक्ट्रिक प्लांटच्या रस्त्याने जाऊ शकतात.
advertisement
भारताचा भाग असूनही हिमाचल प्रदेशातील या गावाची स्वतःची न्यायव्यवस्था आहे. गावाची स्वतःची संसद आहे, ज्यात दोन सभागृह आहेत - पहिले ज्येष्ठ (वरचे सभागृह) आणि दुसरे कनिष्ट (खालचे सभागृह). ज्येष्ठांग सभागृहात एकूण 11 सदस्य आहेत, त्यापैकी प्रधान मंत्री (कारदार), गुरू आणि पुजारी हे तीन स्थायी सदस्य आहेत.
advertisement
advertisement