गाजरचा हलवा खाऊन झोपले, सकाळी उठलेच नाहीत; अख्खं कुटुंब संपलं! तिघांचा मृत्यू
- Published by:Priya Lad
Last Updated:
एकाच कुटुंबातील तिघांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांचा मुलगा यांचा समावेश आहे.
advertisement
हरियाणातील फरिदाबादमध्ये सरूरपूर भागात राहणारं हे कुटुंब. परशुराम, रमेश, रमेशची पत्नी ममता आणि रमेश-ममताचा 5 वर्षांचा मुलगा छोटू. कुटुंबातील चार सदस्य एकत्र झोपले होते. परशुराम सकाळी उठला आणि त्याने इतरांना उठवायचा प्रयत्न केला पण कुणी उठलंच नाही. परशुरामला सकाळी जाग आली. त्याने भाऊ आणि वहिनीला उठवण्याचा प्रयत्न केला. पण कोणीच उठलं नाही. (प्रतीकात्मक फोटो : AI Generated)
advertisement
advertisement
बराच वेळ झाला तरी भाऊ, वहिनी आणि पुतण्या उठला नाही. तेव्हा परशुराम घाबरला. त्याने घरमालकाला फोन करून बोलावलं. घरमालकाच्या म्हणण्यानुसार, हे सर्व कामगार होते. ते मूळचे बिहारचे. त्यांनी 2 महिन्यांपूर्वीच त्याच्याकडून घर भाड्याने घेतलं होतं. परशुरामच्या म्हणण्यानुसार, मृत रमेशच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येत होतं. इतरांच्याही तोंडातून फेस येत होता. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement








