पीडितांसाठी वाघीण तर राजकीय दबाव राजकारण्यांसाठी अडथळा! कोण आहेत दबंग लेडी IPS ऑफिसर दमयंती सेन?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
दमयंती सेन या IPS ऑफिसरने कोलकाता पार्क स्ट्रीट अत्याचार प्रकरणात राजकीय दबावाला न जुमानता पीडितेला न्याय मिळवून दिला आणि आरोपींना पकडले, त्यानंतर त्यांना ट्रान्सफर मिळाली.
advertisement
फेब्रुवारी 2022 मध्ये कोलकाता इथे पार्क स्ट्रीट परिसरात एका महिलेवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली. न्याय मागण्यासाठी पीडित पोलीस ठाण्यात पोहोचली. या महिलेला न्याय मिळू नये यासाठी राजकीय दबाव टाकण्यात आला. महिलेलाच खोटं ठरवण्यात आलं. ही केस बंद करावी यासाठी महिला ऑफिसरवर दबाव टाकण्यात आला. मात्र या कशालाच त्या घाबरल्या नाहीत आणि बळी पडल्या नाहीत.
advertisement
advertisement
advertisement








