'No PUC, No Fuel' भाजप सरकारने या राज्यात घेतला मोठा निर्णय, ग्राहकांना मोठा धक्का
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
दिल्ली सरकारने 18 डिसेंबरपासून PUC नसलेल्या वाहनांना पेट्रोल डिझेल न देण्याचा निर्णय घेतला असून, डीलर असोसिएशनने या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
दुचाकी चारचाकी गाड्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही पेट्रोल पंपावर गेलात तर आता तुम्हाला पेट्रोल मिळणार नाही. याचं कारण म्हणजे तुमची आधी PUC आहे का ते चेक केलं जाईल त्यानंतरच पेट्रोल डिझेल मिळेल. याबाबतची मोठी घोषणा राजधानी दिल्लीत करण्यात आली आहे. जर PUC नसेल तर पेट्रोल न देण्याचा सक्त आदेश काढण्यात आले आहेत.
advertisement
हा नियम 18 डिसेंबरपासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे आधी टाकी फुल्ल करा आणि त्यासोबत तुमची PUC संपली असेल तर ती लगेच काढून घ्या नाहीतर तुमचं काही खरं नाही. तर दुसरीकडे याच निर्णयाला पेट्रोल पंप चालकांनी काहीसा विरोध केला आहे. याचं कारण म्हणजे आम्ही PUC चेक करायचं की पेट्रोल द्यायचं असा सवाल सरकारला विचारला आहे.
advertisement
दिल्ली सरकारने 18 डिसेंबरपासून वैध PUC प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना इंधन न देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर पेट्रोल पंप चालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. प्रत्येक वाहनाचे PUC प्रमाणपत्र तपासणे प्रत्यक्षात शक्य आहे का, असा प्रश्न डीलर असोसिएशनकडून उपस्थित केला जात आहे. डीलर असोसिएशनने पर्यावरण मंत्र्यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला असून, या निर्णयामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.
advertisement
advertisement
डीलर्सनी आणखी एक गंभीर बाब अधोरेखित केली आहे. प्रमाणपत्र मागितल्यास अनेक वाहनचालकांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते आणि त्यातून कर्मचारी व ग्राहकांमध्ये वाद, भांडण किंवा मारहाणीचे प्रकार घडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी 10 ते 15 वर्षे जुन्या वाहनांचा मागोवा घेण्यासाठी बसवण्यात आलेल्या ANPR कॅमेऱ्यांचा प्रयोग अवघ्या दोन दिवसांत अपयशी ठरल्याचेही त्यांनी आठवण करून दिली आहे.
advertisement








