World VadaPav Day: फक्त स्नॅक नाही तर खाद्यसंस्कृतीचा भाग! हे आहेत मुंबईतील 5 सर्वोत्तम वडापाव

Last Updated:
World VadaPav Day: आज (23 ऑगस्ट) जागतिक वडापाव दिवस आहे. मुंबईतील वडापाव हे स्थानिक नागरिक आणि पर्यटक दोन्हींचा विशेष आवडता आहे. वडापाव हा केवळ एक स्नॅक न राहता मुंबईच्या खाद्य संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनला आहे. प्रत्येक ठिकाणच्या वडापावची चव वेगळी असते. आजच्या दिवशी तुम्ही मुंबईतील काही सर्वोत्तम वडापाव मिळत असलेल्या ठिकाणांना भेट दिली तर निश्चितच एक अविस्मरणीय अनुभव मिळेल.
1/5
अशोक वडापाव: अशोक वडापाव हे दादरच्या गजबजलेल्या भागात असलेलं एक साधं पण अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी कुरकुरीत, ताजा आणि मसालेदार वडापाव मिळतो. हा वडापाव खास तिखट चटणी आणि वड्याच्या चुऱ्यासाठी प्रसिद्ध आहे.

advertisement
2/5
ग्रॅज्युएट वडापाव: हे भायखळामध्ये असलेलं एक अत्यंत प्रसिद्ध ठिकाण आहे. इथला वडापाव मोठा आणि चवदार असतो. विशिष्ट मसाला आणि कुरकुरीत पाव तुम्हाला एक उत्तम अनुभव देईल. या ठिकाणी वडावाप प्रेमींची प्रचंड गर्दी असते.

3/5
आराम वडापाव: हे मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध ठिकाण आहे. सीएसटी (चुनाभट्टी सर्कल) येथील आराम वडापाव खूपच चवदार आणि मसालेदार असतो. याठिकाणी तुम्हाला गरमागरम बनवलेला वडापाव मिळतो. ज्याचा तुम्ही पुरेपूर आनंद घेऊ शकता.

4/5
आनंद वडापाव: आनंद वडापाव हे विद्याविहार परिसरात आहे. हा वडापाव चटकदार चटणी आणि ताज्या मसाल्यांसाठी ओळखला जातो. वडापाव सोबत मिळणारे भजी पाव आणि चटणी वडापावच्या चवीला एक वेगळी उंची देतात. या ठिकाणी नेहमी खवय्यांची गर्दी असते.

5/5
भाऊ वडापाव: भाऊ वडापाव हे भांडुप, मुलुंड आणि घाटकोपर मधील एक अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे. इथे खूपच कुरकुरीत आणि मसालेदार वडापाव मिळतो. भाऊ वडापाव त्याच्या आकारासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी कमी पैशात पोटभर वडापाव खाता येतो.

BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement