Gautami Patil Car Accident: अपघात झाला तेव्हा गौतमी पाटील कारमध्येच होती? रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप
- Published by:Sachin S
Last Updated:
गौतमी पाटीलच्या चालकाने ४ दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एका रिक्षाचालकाला धडक दिली होती. सिंहगड पोलिसांनी गौतमीला पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे, जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी गौतमीवर गंभीर आरोप केले आहे. (अभिजित पोते, प्रतिनिधी)
नृत्यांगना आणि अभिनेत्री गौतमी पाटीलच्या चालकाने ४ दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एका रिक्षाचालकाला धडक दिली होती. आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. सिंहगड पोलिसांनी गौतमीला पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे, जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी गौतमीवर गंभीर आरोप केले आहे. ज्यावेळी अपघात घडला तेव्हा गौतमी ही कारमध्ये होती, असा गंभीर रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी केला आहे. एवढंच नाहीतर गौतमी पाटील हिच्या विरोधात स्थानिकांनी पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन केलं आहे.
advertisement
पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात 30 सप्टेंबर २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला होता. गौतमी पाटीलच्या मालकीच्या असलेल्या कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षाला धडक दिली होती. या अपघातात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र, मरगळे यांच्या कुटुंबीयांनी गौतमीवर गंभीर आरोप केले आहे.
advertisement
अपघात झाल्यानंतर आम्ही पोलिसांच्या तपासावर अजिबात समाधानी नाही. घटनास्थळी पंचनामा न करत गौतमी पाटील हिची गाडी हलवण्यात आली होती. ही गाडी कुणी हलवली? टोईंग करून कोण घेऊन गेलं? साक्षीदारांचे जबाब कुणी बदले आहे. आम्हाला आरोपींची ओळख दाखवली नाही. सीसीटीव्ही फुटेज आम्हाला दिले नाही. एवढंच नाहीतर आम्ही गौतमी पाटील यांचं सीडीआर रिपोर्ट मागितले पण पोलिसांनी ते दिले नाही. गौतमी पाटील यांची कार भोरमधून निघाली होती ते अपघात जिथे झाला, त्याचे सीडीआर रिपोर्ट मागितले आहे.
advertisement
आमचा पेशेंट हा व्हेटिलेटरवर आहे. पण ४ दिवस झाले आहे. पोलिसांनी आम्हाला कोणतीही नीट माहिती दिली नाही. पोलिसांनी आम्हाला एक सीसीटीव्ही फुटेज दिलं आहे, ज्यामुळे कार खूप लांब दिसत आहे, यामध्ये कारचा नंबर सुद्धा दिसत नाही. आम्हाला संशय आहे की, पोलिसांनी ज्या ड्रायव्हरला अटक केली आहे, तो मुळ ड्रायव्हरच नाही. पोलीस स्टेशनला दुसराच ड्रायव्हर हजर करण्यात आला. एवढंच नाहीतर फिर्यादीही बदलण्यात आले आहे.
advertisement
या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे. जेव्हा अपघात घडला तेव्हा गौतमी पाटील या कारमध्ये होत्या, त्यांना समोर आणलं पाहिजे. गाडी मालक या गौतमी पाटील आहे तर त्या समोर का येत नाही. पोलिसांना विचारलं तर पोलीस सांगतात की, गौतमीला नोटीस दिली आहे. पण प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करत आहे का? आम्ही सामन्य घरातले आहोत म्हणून तपास करायचा नाही का? असा सवाल मरगळे कुटुंबीयांनी विचारला आहे.
advertisement
अपघात झाल्यानंतर गौतमी पाटील यांच्या टीमकडून साधी विचारपूसही झाली नाही. गौतमी पाटील यांचं कार्यक्रम आजही सुरूच आहे. पण त्यांनी पुढं येऊन साधी विचारपूसही केली नाही. यामुळे त्या कुठे घाबरल्या आहेत का? या प्रकरणी आम्ही पोलीस आयुक्तांकडे जाणार आहोत, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणीही रिक्षाचालक मगराळे यांच्या मुलीने केली आहे.
advertisement