advertisement

आई-बापाचा आधार हरपला! भरधाव स्विफ्ट 5 वेळा उलटली, बीडमध्ये तरुणाचा जागीच मृत्यू

Last Updated:

Accident in Beed: बीड जिल्ह्यातील माजलगाव-परभणी राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या सुमारास एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे.

News18
News18
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: बीड जिल्ह्यातील माजलगाव-परभणी राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या सुमारास एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. छोटेवाडी गावाजवळ भरधाव कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एका २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, कारने रस्त्यावर तब्बल चार ते पाच वेळा पलट्या घेतल्या.

रात्री २.२५ वाजता काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री २.२५ वाजण्याच्या सुमारास घडली. एक स्विफ्ट डिझायर कार माजलगावकडून परभणीच्या दिशेने जात असताना छोटेवाडी फाट्याजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. वेग जास्त असल्याने कार रस्त्यावरून घसरली आणि तिने एकापाठोपाठ एक अशा चार ते पाच पलट्या घेतल्या. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
advertisement

हॉस्पिटल कर्मचारी निवृत्ती खेडेकर यांचा मृत्यू

या दुर्दैवी अपघातात निवृत्ती भाऊसाहेब खेडेकर (वय २५ वर्ष) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. निवृत्ती हा मूळचा परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सिराळा गावचा रहिवासी होता. तो माजलगाव येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होता. त्यांच्या निधनामुळे हॉस्पिटल कर्मचारी आणि त्यांच्या मूळ गावात शोककळा पसरली आहे.
advertisement

जखमीची प्रकृती चिंताजनक

अपघातात आणखी एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमीची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आई-बापाचा आधार हरपला! भरधाव स्विफ्ट 5 वेळा उलटली, बीडमध्ये तरुणाचा जागीच मृत्यू
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement