Weather Alert: थंडीची लाट! सोलापुरातील या ठिकाणी पारा घसरला, तापमान 9 अशांच्या खाली!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून गारठा वाढला आहे. सोलापुरातील जेऊरला सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.
उत्तरेकडील शीत वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्रात येवू लागल्याने गारठा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट टिकून असल्याने हुडहुडी कायम आहे. यामुळे राज्यात गारठा वाढत असून आज 15 नोव्हेंबर रोजी राज्यातील थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. जळगावसह राज्यात काही ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अपडेट जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
राज्यात गारठा वाढत असून, पहाटे धुक्यासह दव पडल्याचे चित्र कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. मात्र थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पहाटे थंडी, दुपारी कडक ऊन आणि रात्री परत गारठा जाणवत असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.


