advertisement

BMC:बीएमसीमध्येही कॉस्ट कटिंगचं वारं, नोकरभरती आणि भत्त्यांवर गदा, कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढलं!

Last Updated:

BMC Cost Cutting: मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर वाढलेला खर्चाचा बोजा कमी करण्यासाठी आता थेट कर्मचाऱ्यांच्या पदांवर आणि भत्त्यांवर गदा येणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने जी पदे कालबाह्य झाली आहेत, ती रद्द करण्याचा मोठा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

बीएमसीमध्येही कॉस्ट कटिंगचं वारं, नोकरभरती आणि भत्त्यांवर गदा, कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढलं!
बीएमसीमध्येही कॉस्ट कटिंगचं वारं, नोकरभरती आणि भत्त्यांवर गदा, कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढलं!
सुमित सावंत, प्रतिनिधी, मुंबई: आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर आता 'कॉस्ट कटींग'चे संकट ओढवल्याचे चित्र आहे. पालिकेच्या तिजोरीवरील वाढता बोजा आणि महसुली खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या तब्बल २७ खात्यांमधील पदांचा फेरआढावा घेतला जाणार असून, यामुळे शेकडो पदे रद्द होण्याची आणि भत्त्यांना कात्री लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कालबाह्य पदांना 'रामराम', तंत्रज्ञानाचा आधार

डिजिटल युगात अनेक कामे आता संगणकीय प्रणालीद्वारे (IT) होत आहेत. त्यामुळे ज्या पदांची उपयुक्तता संपली आहे किंवा तांत्रिक साधनांमुळे जिथे मनुष्यबळाची गरज कमी झाली आहे, अशी पदे रद्द करण्याचा पालिकेचा मानस आहे. अनावश्यक खर्चाला लगाम लावून वाचलेला निधी विकासकामांकडे वळवण्याचा पालिकेचा 'बजेट प्लॅन' आहे.

भरती बंद की केवळ 'फिल्टर'?

advertisement
महापालिकेने अर्थसंकल्पात "भरती बंद" असा शब्दप्रयोग टाळला असला तरी, "अनावश्यक पदभरती" रोखण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
नक्की काय होणार?
ज्या विभागांत प्रत्यक्ष कामाचा ताण आहे तिथे भरती होईल, मात्र जिथे गरज नाही तिथे नवी नियुक्ती टाळली जाईल, असे म्हटले जात आहे. काही विशिष्ट भत्ते कापण्याचा निर्णयही प्रशासकीय पातळीवर घेतला जात आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खिशाला झळ सोसावी लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement

हा निर्णय बेकायदेशीर, कामगार संघटना आक्रमक

प्रशासनाच्या या हालचालींविरुद्ध 'म्युनिसीपल कामगार युनियन'ने शड्डू ठोकला आहे. "आकृतीबंधाच्या नावाखाली नवी पदभरती रोखणे आणि भत्ते कापणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे," असा दावा युनियनने केला आहे. यामुळे येत्या काळात पालिकेत प्रशासन विरुद्ध कामगार संघटना असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

बीएमसी म्हणते, ही पदकपात नाही, तर पुनर्रचना...

advertisement
मुंबई महापालिकेतही नोकरकपात होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर आता महापालिकेने स्पष्टीकरण दिले आहे. ही प्रक्रिया सरसकट पदकपातीसाठी नसून 'कामाच्या गरजेनुसार पुनर्रचना' करण्यासाठी असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
प्रशासकीय सूत्रांच्या मते, "सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीला कोणताही धोका नाही. ही प्रक्रिया केवळ भविष्यातील खर्च नियोजित करण्यासाठी आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी राबवली जात असल्याचेही महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, आता प्रत्यक्षात किती पदे कमी होणार किंवा किती भरती होणार याचा तपशील पुढील प्रशासकीय आदेशांमधून स्पष्ट होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC:बीएमसीमध्येही कॉस्ट कटिंगचं वारं, नोकरभरती आणि भत्त्यांवर गदा, कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढलं!
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement