Weather Alert : वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार, राज्यातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
30 मे रोजी देखील राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
1/8
राज्यात मे महिन्याच्या अखेरीस सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली. राज्यातील विविध भागांत पावसामुळे शेतीचे नुकसान झालेत. गेल्या 24 तासांत सुद्धा राज्यात जोरदार पाऊस झालाय. 30 मे रोजी देखील राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पाहुयात, पुढील 24 तासांत राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.

advertisement
2/8
 विदर्भात सर्वच जिल्ह्यांना 30 मे रोजी हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 30 मे रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या सर्वच भागांत हवामान विभागाकडून कोणताही अलर्ट जारी केलेला नाही. मुंबईत 30 मे रोजी सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

3/8
मुंबईसह कोकण विभागातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

4/8
पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छ्त्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील इतर उर्वरित जिल्ह्यांत म्हणजेच जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर या सर्व जिल्ह्यांत 30 मे रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

5/8
नाशिकमध्येही सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव या तिन्ही जिल्ह्यांत सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

6/8
नागपूरमध्ये 30 मे रोजी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे.

7/8
राज्यातील सर्वच भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात यावर्षी मान्सून लवकर दाखल झाल्याने शेतकरी आधीच चिंतेत आहे. त्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळं शेतात असलेल्या पिकांचे सुद्धा नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.

8/8
विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. त्याचबरोबर हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement