Weather Alert: राज्यावर अस्मानी संकट, पुढील 24 तास धोक्याचे, 15 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Last Updated:
Weather Alert: पुढील 24 तास देखील राज्यात महत्त्वाचे असणार आहेत. पाहुयात 26 जुलै रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
1/7
मागील 24 तासांपासून राज्यामध्ये संततधार पाऊस होत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात त्याचबरोबर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

advertisement
2/7
त्याचबरोबर पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूरमध्येही मुसळधार पाऊस होत असल्याचे पाहायला मिळतंय. पुढील 24 तास देखील राज्यात महत्त्वाचे असणार आहेत. पाहुयात 26 जुलै रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.

3/7
26 जुलै रोजी राज्यामध्ये पालघर, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुण्याच्या घाटमाथ्यावर देखील अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

4/7
 कोकणातील मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

5/7
नाशिक आणि साताऱ्याच्या घाट परिसराला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.

6/7
विदर्भातील चंद्रपूर आणि भंडाऱ्याला रेड अलर्ट तर अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूरचा घाट भाग, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

7/7
एकंदरीत 26 जुलै रोजी संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर हा तीव्र असणार आहे. सोलापूर, सांगली, सातारा, लातूर आणि धाराशिवमध्ये तुलनेने पाऊस कमी असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement