Weather Alert: राज्यातील 5 जिल्ह्यांसाठी पुढील 24 तास धोक्याचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट

Last Updated:
पुढील काही दिवस राज्यात पावसापासून उसंत मिळण्याची शक्यता आहे. पाहुयात 2 ऑगस्ट रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
1/7
मागील दोन दिवसांपासून राज्यात बहुतेक ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होत असल्याचे देखील पाहायला मिळतंय. पुढील काही दिवस राज्यात पावसापासून उसंत मिळण्याची शक्यता आहे. पाहुयात 2 ऑगस्ट रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.

advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अधूनमधून हलक्या पावसाची शक्यता आहे. मुंबईबरोबरच ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

3/7
पुणे शहरामध्ये ही ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असून हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. पुण्याबरोबरच सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही पावसाची उघडीप पाहायला मिळणार आहे.

4/7
उत्तर महाराष्ट्रातही पावसाने उसंत घेतली आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर जिल्ह्यात सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असून एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

5/7
मराठवाड्यातही पावसाने काढता पाय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ आकाशाची शक्यता आहे. स्थानिक वातावरण निर्मिती होऊन काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो.

6/7
विदर्भातील पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसासाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे.

7/7
पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची उघडीप असणार आहे. एकंदरीत मागील आठवड्यात पावसाने संपूर्ण राज्यात दमदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. आता मात्र पूर्व विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यातून पावसाने काढता पाय घेतल्याचे चित्र आहे.

Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement