advertisement

Weather Alert : आता पाऊसच पाऊस पडणार, हवामान विभागाचा या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट

Last Updated:
Weather Alert : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
1/7
प्रचंड उष्णतेने लाहीलाही झालेल्या राज्यातील जनतेला काहीसा दिलासा मिळणार असून पुढील दोन-तीन दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. पाहुयात 4 मे रोजी संपूर्ण राज्यांमध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.

2/7
कोकण विभागातील मुंबई शहर आणि उपनगर तसेच ठाणे आणि रायगडमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये कोरडा हवामान राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे.

3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि साताऱ्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये कोरडा हवामान पाहायला मिळेल. पुण्यामधील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे तर आगामी काळामध्ये पुणे शहरांमध्ये देखील पावसाची शक्यता असल्याने तापमानात घट संभवते.

4/7
उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून ढगांच्या गडगडासह आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक जळगाव आणि अहिल्यानगर अशा सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसासाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

5/7
 तर मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्यातील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे तर आगामी काळामध्ये पावसाचे वातावरण कायम राहणार असल्याने मराठवाड्यातील तापमानामध्ये देखील घट होण्याची शक्यता आहे.

6/7
विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसासाठी येलो अलर्ट जाहीर केला आहे. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांना पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

7/7
 एकंदरीत पुढील तीन ते चार दिवस राज्यावर अवकाळी पावसाचे सावट आहे. या पावसामुळे वाढलेल्या उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार असून तापमान मध्ये 3 ते 4 अंशांनी घट होण्याची देखील शक्यता आहे.

मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement