पुण्यात आल्यावर बाकरवडी खा, पण इथले वडापाव एकदा खाऊन तर बघा
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
मुंबईप्रमाणेच आता पुण्यातही वडापावची लोकप्रियता वाढली आहे. तिथेही वडापावचे खास ब्रँड तयार झाले आहेत. आज आपण पुणे शहरातल्या बेस्ट 5 वडापावबद्दल जाणून घेऊया.
खत्री बंधू : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या येथे गेल्या पंचवीस वर्षापासून खत्री बंधू यांची वडापावची हातगाडी आहे. हा वडापाव अतिशय चविष्ट असून वडापावचा घाणा काढल्याबरोबरच मोजून पाच ते दहा मिनिटांमध्ये वडे फस्त होतात. एक वडापाव खाल्ल्यावर तुम्हाला दुसऱ्या वडापाव नक्कीच खायची इच्छा होते. कुठे खाणार : महर्षी शिंदे पूल, शिवाजी नगर, पुणे
advertisement
गार्डन वडापाव : पुण्यातील सर्वात सुप्रसिद्ध वडापाव म्हणून गार्डन वडापाव ओळखला जातो. ह्या वडापावची चव इतर कोणत्याही वडापावला नाही हे सर्वजणच म्हणतात. इथे एकाच वेळेस कमीत कमी 100 वडे तळले जातात. आणि दिवसाला चार ते पाच हजार वडे पाव इथे विकले जातात. या वडापावची टेस्ट तर न्यारी आहेच मात्र ह्यांच्या वड्यासोबत मिळणारी मिरची ही अतिशय वेगळी आहे. ही किंचितशी आंबट आणि उकडलेली मिरची असते. त्याच्यामुळे ह्या मिरची चव वेगळी लागते. हा वडापाव गरम गरम खाण्याची मजा असते त्यासोबतच हा वडापावची चटणी देखील खूप प्रसिद्ध आहे. कुठे खाणार : 7 गार्डन वडापाव, जेजे गार्डन, कॅम्प, पुणे
advertisement
advertisement
जोशी वडेवाले : पुण्यात जोशी वडेवाल्यांचे वडे खाल्ले नाही असं फार क्वचितच घडत. पुण्यात अनेक ठिकाणी जोशी वडेवालेच्या ब्रँच आहेत. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या समोर जोशी वडेवाल्यांची मेन ब्रांच आहे. इथे मिळणारा वडापाव हा खास आहे. यासोबतच या वडापाव सोबत तुम्हाला लसणाची चटणी देखील मिळते. हा वडा कमी तेलकट असतो. त्यासोबत मिळणारी चविष्ट अशी आंबट-गोड चटणी ग्राहकांना तृप्त करते.
advertisement
श्रीकृष्ण वडेवाले : पुण्यामधील वडापाव मध्ये स्वतःची वेगळी ओळख जपणारा वडापाव म्हणजे श्रीकृष्ण उपहारगृहाचा वडापाव म्हणजे श्रीकृष्ण वडेवाले .यांच्या वडापावची अशी खासियत आहे की यांचा पाव हा स्पेशल बनवला जातो. हा जंबो पाव असतो आणि एका पावमध्ये तुम्ही दोन वडे खाऊ शकता. याचा वडा हा गोली वडा ह्या प्रकारातला असून ह्या वडापावचे आवरण थोडीशी जाड असते. गरम गरम हा वडापाव खायला प्रचंड टेस्ट लागतो. कुठे खाणार: सारंग सोसायटी, पर्वती दर्शन, पुणे