advertisement

महिलांनो कॅब बुक करताना सावधान; पुण्यातील ही घटना वाचून बसेल धक्का, बाणेरमध्ये भरदिवसा प्रकार

Last Updated:

४२ वर्षीय महिलेने रविवारी सकाळी आपल्या प्रवासासाठी एका प्रसिद्ध अॅपवरून कार बुक केली होती. मात्र, यावेळी तिला भयंकर अनुभव आला.

कॅब चालकाकडून विनयभंग (AI Image)
कॅब चालकाकडून विनयभंग (AI Image)
पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बाणेर भागात प्रवाशांची ने-आण करणाऱ्या एका कारचालकाने ४२ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मोबाईल ॲपवरून कार बुक करणे एका महिलेसाठी अत्यंत भयानक अनुभव ठरला. याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित ४२ वर्षीय महिलेने रविवारी (१ फेब्रुवारी) सकाळी आपल्या प्रवासासाठी एका प्रसिद्ध अॅपवरून कार बुक केली होती. प्रवास पूर्ण झाल्यानंतर बाणेर परिसरात कार थांबली असता, भाड्याच्या रकमेवरून चालक आणि महिला यांच्यात किरकोळ वाद झाला. मात्र, या वादाचे रूपांतर अत्यंत खालच्या थरातील कृत्यात झालं.
अश्लील कृत्य करून चालक पसार
भाड्यावरून झालेल्या वादानंतर कारचालकाने महिलेशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात त्याने महिलेचा विनयभंग करत अश्लील कृत्य केलं. या प्रकारामुळे महिला प्रचंड हादरली. पीडित महिलेनं आरडाओरडा करण्यापूर्वीच आरोपी कारचालक तिथून पसार झाला. या धक्कादायक प्रसंगानंतर महिलेनं तातडीने बाणेर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली आणि तक्रार दाखल केली.
advertisement
पोलिसांकडून तपास सुरू
बाणेर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित कारचालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अॅपवरील माहिती आणि कारच्या नंबरवरून चालकाचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पोलीस हवालदार शिरसाठ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
प्रवाशांसाठी सुरक्षेच्या टिप्स:
कॅब किंवा करामध्ये बसल्यानंतर अॅपमधील 'शेअर राईड' किंवा 'एसओएस' (SOS) बटण वापरावे. गाडीत बसण्यापूर्वी गाडीचा नंबर आणि चालकाचा फोटो अॅपमधील माहितीशी जुळवून पाहावा. तसेच असा कोणताही गैरप्रकार घडल्यास तात्काळ १०० किंवा ११२ नंबरवर पोलिसांशी संपर्क साधावा.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
महिलांनो कॅब बुक करताना सावधान; पुण्यातील ही घटना वाचून बसेल धक्का, बाणेरमध्ये भरदिवसा प्रकार
Next Article
advertisement
GK Quiz: गोव्यापेक्षा पाच पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो, 99% लोकांना नाव सांगता येणार नाही
गोव्यापेक्षा 5 पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो
  • गोव्यापेक्षाही लहान, पण खिशात अख्खं जग

  • एका शहराचा संपूर्ण देश कसा झाला?

  • 99% लोकांना देशाचं नाव सांगता येणार नाही

View All
advertisement