Weather Alert: विजांचा कडकडाट होणार, या भागाला झोडपणार, पुणे ते कोल्हापूर आजचा हवामान अंदाज

Last Updated:
Pune Rain: गेल्या काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरला आहे. पुणे आणि साताऱ्याच्या काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
1/7
राज्यात मान्सूनचा जोर वाढला असून कोकण घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. आज 19 जून रोजी कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/7
गेल्या 24 तासात साताऱ्यातील कोयना येथे उच्चांकी 130 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच सातारा जिल्ह्यात 11 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. पुढील 24 सातारा जिल्ह्यात ढगाळ आकाशासह हलका पाऊस असेल. मात्र सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

3/7
पुणे जिल्ह्यात मागील 24 तासात 29.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमान 31 अंशावर राहिल. पुण्यामध्ये पाऊस काहीशी उघडीप घेण्याची शक्यता असली तरीही पुणे घाटमाथ्यावर मात्र जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

4/7
मागील 24 तासात कोल्हापूर परिसरात 9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. यावेळी कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस वर असेल.

5/7
गेल्या 24 तासात सांगली जिल्ह्यात 0.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज सांगली जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 31 तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके राहील.

6/7
सोलापूर जिल्ह्यात बुधवारी कमाल तापमान 34 अंशावर राहिले. पुढील 24 तासात सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमान 34 अंशावर राहील. ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

7/7
राज्यातील कोकण, घाटमाथा आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाने काहीशी उघडीप दिली असली तरी अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना हवामान पाहून योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement