Weather Alert: सूर्य तळपणार, उन्ह होरपळणार! पश्चिम महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा, पाहा हवामान अंदाज

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात मे महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेची तीव्रता वाढली आहे. सोलापुरात सर्वाधिक तापमानाची नोंद झालीये.
1/7
मे महिन्याच्या सुरुवातीला राज्यात उन्हाचा चटका वाढला असून कमाल तापमानात चढ-उतार जाणवणार आहे. 1 मे रोजी अकोला येथे राज्यातील उच्चांकी 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा सर्वाधिक उष्ण असून सोलापुरातील पारा 43 अंशांवर  राहिला.

advertisement
2/7
गेल्या 24 तासात पश्चिम महाराष्ट्रातील सरासरी तापमान 21.4 ते 43.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर सोलापुरातील कमाल तापमान 43.6 अंश तर किमान तापमान 27.6 अंश सेल्सिअस इतके राहिले. पुढील 24 तास सोलापुरातील उष्णता कायम राहणार असून कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस राहिल.

3/7
सातारा जिल्ह्यातील कमाल पारा 42 अंश सेल्सिअस तर किमान  24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. मागील 24 तासात साताऱ्यातील पारा 40.7 अंशांवर राहिला. या काळात आकाश निरभ्र राहील. अवकाळी पावसाचे सावट दूर असून उकाडा प्रचंड जाणवत आहे.

4/7
पुणे जिल्ह्यात उन्हाचा चटका कायम असून मागील 24 तासात 39.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर पुढील 24 तासात पुण्यातील पारा 40 अंशांवर जाण्याचा अंदाज आहे.  पुण्यातील आकाश मुख्यता निरभ्र राहील.

5/7
सांगली जिल्ह्यात उन्हाची होरपळ कायम आहे. तापमानात अंशता वाढ जाणवत असून मागील 24 तासात जिल्ह्यात 39.4 कमाल तापमानाची नोंद झाली. आज कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहिल. तर आकाश निरभ्र राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

6/7
कोल्हापुरातील पारा 36 अंशापर्यंत घटला असून पुढील 24 तासात कोल्हापुरातील तापमानात अंशत: वाढ राहील. कमाल 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके राहील. आकाश निरभ्र राहील.

7/7
राज्यातील तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहेत. मे महिना उष्णतेमुळे अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement