हत्ती, सिंह आणि गरूड; राम मंदिराच्या प्रवेशद्वाराचे पहिले Photo, पाहून डोळे दिपतील!
- Published by:Priya Lad
Last Updated:
राममंदिराच्या उद्घाटनाआधी पहिल्यांदाच प्रवेशद्वाराची झलक दाखवण्यात आली आहे.
राम जन्मभूमी मंदिराचा 22 जानेवारीला भव्य उद्घाटन सोहळा आहे. आतापर्यंत राममंदिराचे बरेच फोटो तुम्ही पाहिले असतील. पण आता पहिल्यांदाच मंदिराच्या प्रवेशद्वाराची झलक दाखवण्यात आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
तीन मजली मंदिर पारंपरिक नागर शैलीतील आहे. याची लांबी 380 फीट, रूंदी 250 फीट आणि उंची 161 फीट आहे. प्रत्येक मजला 20 फीट उंच आहे. मंदिरात एकूण 392 खांब आणि 44 दरवाजे आहेत. रामंदिराचं प्रवेशद्वार पूर्वेकडून आहे. सिंहद्वाराच्या माध्यमातून 32 जिने चढावे लागतात. (सर्व फोटो - X/राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट)