शेकडो वर्षांपासून या गावात लग्नच होत नाही, पाहा काय आहे परंपरा?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
महाराष्ट्रातील या गावामध्ये मुला-मुलींचे लग्न होत नाहीत. शेकडो वर्षांची ही परंपरा आजही कायम आहे.
आपल्या देशात अनेक रूढी आणि परंपरा आजही पाळल्या जातात. अनेक गावात वेगवगेळ्या अशा रूढी आणि परंपरा या चालत आलेल्या असतात. या विषयी आपल्या सर्वाना जाणून घेण्याची ही ईच्छा असतेच. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असं एक गाव आहे या गावामध्ये मुला-मुलींचे लग्न गावात होत नाहीत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या मागे कारणं असं की, एक राक्षस देवी सोबत लग्न करण्यासाठी जबरदस्ती येत होता. देवीला लग्न करायचं नव्हतं तरी सुद्धा हा राक्षस लग्नासाठी गावात येत होता. त्यामुळे त्यांच्यासोबत जे येणारे वऱ्हाड येत होतं ते गावाच्या बाहेर शिळा होऊन पडलेले आहे. म्हणजेच या वऱ्हाडाचे हे दगड झालेले आहेत, असं गावकरी दत्तात्रेय थोटे यांनी सांगितलं.
advertisement
त्यासोबतच या गावांमध्ये तुम्हाला कोणत्याच घरावरती दुसरा मजला हा बघायला भेटणार नाही. यामागे देखील एक विशिष्ट कारण आहे. देवीचे मंदिर त्यापेक्षा उंच आपलं घर नसावं म्हणून या गावात कोणीही घरावरती दुसरा मजला बांधत नाही. इथं असं कोणाला बंधन नाहीये पण या गावात ही परंपरा चालत आलेली आहे. म्हणून कोणीही घरावरती दुसरा मजला बांधत नाही, असं मंदिर पुजारी प्रकाश वानोळे यांनी सांगितलं.
advertisement
advertisement
आम्ही पिढ्यानपिडा या देवीची पूजा ही करत आलेलो आहोत. या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी कोणीही येऊ शकतं. हे मंदिर सर्वांसाठी खुले आहे. तसंच आम्ही इथं कोणताही दक्षिणा किंवा दान या मंदिरात स्वीकारत नाहीत. या गावात जा रूढी परंपरा आहेत त्या गावकऱ्यांना त्यांच्या पूर्वजांनी सांगितलेल्या आहेत, त्यामुळे हे सर्व गावकरी या परंपरा पाळत आलेले आहेत,असंही मंदिर पुजारी प्रकाश वानोळे यांनी सांगितलं. (अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी )
advertisement