दिवाळीत लक्ष्मीपूजनाला का असतो तिचा धोका? कसं काढायचं घराबाहेर?

Last Updated:
दिवाळीत लक्ष्मीपूजन करताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. तिला वेळीच बाहेर काढलं तर घरात सुख संपत्ती नांदेल.
1/9
लक्ष्मीपूजन दिवाळीचा महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी घरोघरी लक्ष्मीची पूजा केली जाते. घरी सुख संपत्ती नांदण्यासाठी प्रार्थना केली जाते. मात्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीच्या मागे लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी देखील येते. या अलक्ष्मीला घराबाहेर काढणंही खूप महत्त्वाचं आहे. याबाबत हेमंतशास्त्री पाचखेडे यांच्याकडून जाणून घेऊया.

advertisement
2/9
दिवाळीत मुहूर्तावरती आपण लक्ष्मीपूजन करतो. मात्र रात्रीच्या वेळेला बारा वाजल्यानंतर आपल्याला अलक्ष्मीचं नि:सारण करायचं आहे. अलक्ष्मीचं नि:सारण कसं करावं? तर झाडू घ्यायचा. त्याला जमिनीला लावायचं आणि सरळ लोटत दाराकडे न्यायचा. त्याला उचलायचं नाही. घराबाहेर काढून झाडू झटकून टाकायचा. याला अलक्ष्मीचं नि:सारण म्हणतात. असं केल्यानं तुमच्या घरात सुख संपत्ती सदैव नांदत राहील. अंबाबाईचा वास राहील, असे पाचखेडे महाराज सांगतात.

3/9
श्रीमद्भागवत या ग्रंथात अलक्ष्मीबाबत कथा आलेली आहे. जेव्हा देवी लक्ष्मीच्या विवाहाचा विचार आला तेव्हा लक्ष्मीची जोडी श्रीविष्णू बरोबर जुळलेली होती. पण अलक्ष्मीचं काय? तिच्याशी कोण लग्न करणार? म्हणून विष्णू भगवंतांनी तुझ्यासाठी मी वर शोधतो असा शब्द दिला. त्यानुसार भगवंताने अलक्ष्मी करिता उल्कापत नावाचा एक ऋषीपुत्र शोधला. उल्कापाता बरोबर अलक्ष्मीचा विवाह लावून दिला. अलक्ष्मी आणि ऋषी पुत्र यांच्यात कुठेच साम्य जुळत नाही, परंतु त्या काळातील प्रथा परंपरेनुसार त्यांचा विवाह झाला.

4/9
ऋषीपुत्र ब्रह्म मुहूर्तावर उठून वेदमंत्र म्हणायचा. माझ्या कर्तव्याला पत्नीची साथ असणे गरजेचे आहे, असं ऋषिपुत्राचं मत होतं. मात्र अलक्ष्मी म्हणजे अवदसा. उशिरा उठायची, अवर्तन करायची. पतीला न शोभणारी कामं करायची. त्यामुळे संतापलेला ऋषिपुत्र 'मी येतो तू पाच मिनिटे थांब' असं सांगून गेला, तो आजपर्यंत परतलाच नाही. मग अलक्ष्मीला कुणासोबत राहावं? असा प्रश्न पडला आणि भगवान विष्णूच्या गळ्यात हार घालण्याचा विचार केला.

5/9
अलक्ष्मीच्या हट्टामुळे विष्णू भगवंतांनी अलक्ष्मीला अट घातली की मी आठवड्यातून सहा दिवस तुझ्या बहिणीसोबत म्हणजे लक्ष्मीसोबत राहील आणि एक दिवस तुझ्यासोबत म्हणजे अलक्ष्मी सोबत राहील. तिथे पिंपळाचा मोठा वृक्ष होता, तिला वृक्षामध्ये राहायला सांगितलं.

6/9
विष्णू भगवंतांनी अलक्ष्मीला पिंपळाच्या झाडात समाविष्ट होण्याचं आवाहन केलं. म्हणून शनिवारच्या दिवशी झाडाला प्रदक्षिणा करतात दिवा लावतात, पाणी घालतात याच्या मागचं हे कारण आहे की या दिवशी विष्णू भगवंताचा वास त्या ठिकाणी पिंपळ वृक्षात असतो. जिथं विष्णू आणि लक्ष्मी असते, तिथं अलक्ष्मी जाते. ही या मागची आख्यायिका आहे, असं हेमंत शास्त्री पाचखेडे महाराज सांगतात.

7/9
अस्वच्छता, अशांतता, कटकटी, व्यसन यांच्या घरी यांच्या घरी अलक्ष्मी सदैव वास करत असते. घरामध्ये मांसाहार शिजवू नये. अन्नपूर्णा भ्रष्ट होते. आपल्या घरी शुद्ध सात्विक अन्न शिजवले पाहिजे. हे सगळं केव्हा होईल जेव्हा अलक्ष्मी दूर राहील. लक्ष्मीपूजन दिनाच्या दिवशी अलक्ष्मी सुद्धा तिच्या मागे येत असते. त्या अलक्षमीचं नि:सारण करणे खूप गरजेचे असते. जेणेकरून घरात सुख समृद्धी शांती नांदेल, असं पाचखेडे शास्त्री सांगतात.

8/9
यावर्षीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीचं पूजन झाल्यानंतर घरात सुखशांती कायम राहण्यासाठी रात्री बारा वाजता घरात झाडू जमिनीला लावल्यावर न उचलता घराबाहेर केर काढायचा आहे .याला म्हणतात अलक्ष्मीचं निःसारण करणे. तुम्हीदेखील घरात सुख संपत्ती, समृद्धी, आनंद, शांती आणि प्रसन्नतेसाठी यावर्षीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीचं निःसारण नक्कीच करायला हवं, असं महाराज सांगतात.

9/9
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement