टेन्शन दूर व्हायला मिनिटही नाही लागणार! प्रेमानंद महाराजांनी सांगितला जबरदस्त उपाय

Last Updated:
Premanand Maharaj thoughts: आजकाल स्पर्धा एवढी वाढलीये की, एक संपल्यावर दुसरं काम समोर हजर असतंच. शरिराला आराम द्यायला पुरेसा वेळच मिळत नाही. मनातही सतत विचार सुरू असतात. मग येतो भरपूर ताण. या ताणावर मात कशी करावी, हेच आज आपण जाणून घेणार आहोत. (निर्मल कुमार राजपूत, प्रतिनिधी / नवी दिल्ली)
1/5
वृंदावनचे प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज हे आयुष्यातल्या मोठमोठ्या अडचणींवर अगदी सहजपणे उपाय सांगतात. ते म्हणतात, जास्त चिंतेमुळे मानसिक ताण येतो. त्यानं परिस्थिती आणखी बिघडू शकते. त्यामुळे कशाचीही चिंता करू नये, स्वत:वर विश्वास ठेवावा आणि सारंकाही देवावर सोडून नि:श्चिंत व्हावं.

advertisement
2/5
सर्वात महत्त्वाचं म्हणजे केवळ संकटकाळात देवाला साद घालू नये. तर त्याची दररोज भक्ती करावी. संकटं आल्यावर देवाला शरण जावं. कुलदेवतेची पूजा केल्यानं दु:खांशी लढण्याची ताकद मिळू शकते, असं प्रेमानंद महाराज सांगतात.

3/5
महाराज म्हणाले, मन विचलित व्हायला एखादं ठराविक कारण पुरेसं नसतं. अगदी कोणत्याही कारणानं मन चंचल होऊ शकतं, तणाव येऊ शकतो. त्यामुळे आपण आपली सर्व कामं वेळोवेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. मनात चांगले विचार ठेवावे. आयुष्यात जेवढा नीटनेटकेपणा असेल तेवढंच मन स्वच्छ राहील. 

4/5
कधीकधी आपल्याला खूप भीती वाटते. या परिस्थितीतून बाहेर कसं यायचं आणि मी बाहेर पडेन की नाही अशा विचारांनी मन अस्वस्थ होतं. अशावेळी केवळ देवावर विश्वास ठेवावा. मन एकाग्र करून देवाचं नामस्मरण करावं. त्यातून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. 

5/5
महाराजांनी सांगितलं, आजकाल प्रचंड धावपळीचं आयुष्य आहे, स्पर्धा खूप आहे. अशात ताण येऊच शकतो. परंतु देवावर विश्वास असेल तर कोणत्याही ताणावर, संकटावर मात करण्याची ताकद शरिराला, मनाला मिळते.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement