Religious: पूजा करताना या 3 गोष्टी घडल्या तर शुभ-लाभ; केलेली उपासना सफल झाल्याचे ते संकेत

Last Updated:
Religious things: हिंदू धर्मात पूजा-उपासनेला विशेष महत्त्व आहे. कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी पूजा करणे, अनिवार्य मानले जाते. तसेच अनेक घरांमध्ये दिवसाची सुरुवात नित्य देवपूजेने होते. त्यामुळे संपूर्ण दिवस चांगला जातो आणि मनही शांत राहतं. देवाच्या कृपेनं सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि सौभाग्य प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. पण, अनेकांच्या मनात असा प्रश्न येतो की, आपण केलेली पूजा-उपासना आपल्या प्रिय देवतेपर्यंत पोहचली असेल की नाही. पूजा करताना आपल्याकडून काही चूक तर होत नाही ना? असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. शिव पुराणानुसार पूजा करताना काही गोष्टी दिसल्या तर समजावे की, देवी-देवतांनी तुमची पूजा स्वीकारली आहे.
1/5
शिवपुराणानुसार, आपण पूजा करत असताना दैवी शक्तीद्वारे काही संकेत मिळतात. ते ओळखून आपली पूजा सफल झाल्याचे तुम्ही ओळखू शकता.
शिवपुराणानुसार, आपण पूजा करत असताना दैवी शक्तीद्वारे काही संकेत मिळतात. ते ओळखून आपली पूजा सफल झाल्याचे तुम्ही ओळखू शकता.
advertisement
2/5
पूजा करताना या गोष्टी घडल्यास - शिवपुराणानुसार, खालील तीन व्यक्तींपैकी कोणीही पूजा करताना अचानक आल्यास किंवा दिसल्यास समजून घ्या की, पूजा सफल झाली आहे, आणि आपल्यावर देवाचा विशेष आशीर्वाद आहे.

3/5
गाय दिसणं/येणं -हिंदू धर्मात गायीला माता म्हणून पूजले जाते. गायीमध्ये सर्व देवता वास करतात, असे मानले जाते. पूजा करताना तुमच्या दारात गाय आली तर समजा की, देवानं तुमची पूजा स्वीकारली आहे. अशावेळी शक्य असल्यास गायीच्या पायाला स्पर्श करून वंदन करण्यासोबतच तिला गवत किंवा इतर काही खाऊ घालावे.

4/5
बहीण किंवा मुलगीचे आगमन -पूजा करताना अचानक बाहेरून तुमची बहीण किंवा मुलगी तुमच्या समोर आली तर समजा, तुमची पूजा सफल झाली आहे. देवदेवतांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत.
बहीण किंवा मुलगीचे आगमन -पूजा करताना अचानक बाहेरून तुमची बहीण किंवा मुलगी तुमच्या समोर आली तर समजा, तुमची पूजा सफल झाली आहे. देवदेवतांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत.
advertisement
5/5
ऋषी आणि संत -पूजेच्या वेळी काही तेजस्वी ऋषी किंवा संत दारी आले तर समजा तुमची पूजा यशस्वी झाली आहे. भक्तीत तल्लीन झालेला साधू-संत जर प्रामाणिक भावनेने आला असेल तर तुमची उपासना सफल झाली, असे समजा. 
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
ऋषी आणि संत -पूजेच्या वेळी काही तेजस्वी ऋषी किंवा संत दारी आले तर समजा तुमची पूजा यशस्वी झाली आहे. भक्तीत तल्लीन झालेला साधू-संत जर प्रामाणिक भावनेने आला असेल तर तुमची उपासना सफल झाली, असे समजा. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement