गुरू करणार वक्री गोचर; 4 महिन्यांत उजळणार 'या' तीन राशींचं नशीब; प्रगती, धनलाभाचे योग
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
ज्योतिषशास्त्रात गुरू हा ग्रह महत्त्वाचा मानला गेला आहे. गुरू साधारणपणे दर वर्षी राशिपरिवर्तन करतो. शनीनंतर गुरू हा मंदगती ग्रह मानला जातो. सध्या गुरू शुक्राच्या वृषभ राशीतून गोचर करत आहे. ऑक्टोबर महिन्यात गुरू वृषभ राशीत वक्री होत आहे. गुरूचं वक्री गोचर महत्त्वपूर्ण मानलं जातं. गुरू वक्री होताच तीन राशींना अनुकूल फळं मिळू शकतात. या राशी कोणत्या ते सविस्तर जाणून घेऊ या.
गुरू हा ग्रह शुभ मानला जातो. सुख, सौभाग्य, यश, शिक्षण, ज्ञानाचा स्वामी असलेला गुरू कुंडलीत सुस्थितीत असेल तर चांगली फळं मिळतात. अशा व्यक्तींचं वैवाहिक जीवन सुखमय असतं. गुरू ग्रह एका वर्षाने राशिपरिवर्तन करतो. यानुसार राशिचक्रातून गोचर करून पुन्हा एकाच राशीत येण्यासाठी गुरूला 12 वर्षांचा कालावधी लागतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement