सुखकारक शुक्राच्या प्रिय 3 राशी, या राशींच्या व्यक्ती जगतात प्रचंड सुखात, दिसतात जणू सौंदर्याची खाण!
- Published by:Isha Jagtap
Last Updated:
Shukra Astrology: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला विशिष्ट महत्त्व आहे. शुक्राला म्हणतात साक्षात सुखकारक, या ग्रहाच्या कृपेनं काही राशींच्या व्यक्ती अत्यंत सुखात जगतात, असं ज्योतिषी सांगतात.
शुक्र ग्रहाला भौतिक, शारीरिक आणि वैवाहिक सुखांचा कारक मानतात. बुध आणि शनी हे त्याचे मित्र ग्रह, तर सूर्य आणि चंद्र हे शत्रू ग्रह आहेत, असं म्हणतात. शुक्राचा 23 दिवसांमधून एकदा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश होतो. ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत शुक्राचं स्थान शुभ आणि उच्च असतं, तिला कधीच कसलीच कमतरता भासत नाही. शुक्राच्या शुभ प्रभावामुळे या राशींच्या व्यक्तींना साक्षात धनदेवता लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे शुक्राच्या प्रिय राशी नेमक्या कोणत्या आहेत, जाणून घेऊया.
advertisement
वृषभ : या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्यामुळे ही रास अगदी सौंदर्याचं प्रतीक मानली जाते. असं म्हणतात की, या राशीच्या व्यक्ती बुद्धिमान असतात. त्यांच्याकडे सौंदर्य असतंच, शिवाय शिक्षणातही त्या यश मिळवतात. विशेषत: त्यांना वयाच्या तिसाव्या वर्षानंतर प्रचंड यश मिळतं. त्या सहनशील असतात, भरपूर पैसे कमावण्यासाठी मेहनतही करतात.
advertisement
तूळ : या राशीच्या व्यक्तींना आपल्या आयुष्यात सर्वप्रकारे सुख-सुविधा मिळतात. त्या महागड्या वस्तूंच्या शौकीन असतात. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या दिवस-रात्र मेहनत करतात. तसंच त्यांना कायम टापटिप राहायला आवडतं. त्यांना मित्रांकडूनही उत्तम सहकार्य मिळतं. महत्त्वाचं म्हणजे या व्यक्ती इतरांच्या मदतीसाठी सदैव तयार असतात.
advertisement
मीन : ही शुक्र ग्रहाची उच्च रास मानली जाते. त्याच्या कृपेनं या राशीच्या व्यक्ती क्रिएटिव्ह विचारांच्या असतात. विशेषत: कला, विज्ञान, संगीत क्षेत्रात त्या यशस्वी होतात. अध्यात्माकडे त्यांचा कल असतो. एखादं काम करायचं ठरवलं की, ते पूर्ण करूनच त्या शांत बसतात. तसंच त्या आपलं म्हणणं अत्यंत स्पष्टपणे मांडतात.
advertisement


