असं पण असतंय? आठवडाभर चिकन, मटण चालतं पण रविवारी नाही! कारण काय?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे नॉनव्हेजचे वार मानले जातात. रविवारी तर मासे म्हणू नका, चिकन म्हणू नका आणि मटण म्हणू नका...घराघरातून नुसता सुगंध दरवळत असतो. पण काहीजण रविवारी अजिबात मांसाहाराला स्पर्शसुद्धा करत नाहीत. आठवड्याच्या इतर दिवशी मांसाहार करत असले तरी ते रविवारी मात्र शाकाहारी पदार्थच खातात. असं का बरं? (गुरुगणेश डबगुली, प्रतिनिधी / बंगळुरू)
सोमवार, गुरूवार, शनिवार या वारांना धार्मिक महत्त्व आहे म्हणून या दिवशी मांसाहार केला जात नाही. अर्थात हा प्रत्येकाच्या आवडीचा मुद्दा आहे. परंतु रविवारी नॉनव्हेज न खाण्यामागचं नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य : Canva)
advertisement
रविवार हा आठवड्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. हा सुट्टीचा, आरामाचा दिवस असतोच. मात्र तो सूर्याचं प्रतिनिधित्त्व करतो. म्हणूनच रविवार कितीही आरामदायी असला तरी तो ऊर्जावान दिवस वाटतो. (फोटो सौजन्य : Canva)
advertisement
ज्योतिषशास्त्रात ग्रह, ताऱ्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सूर्याला सर्व ग्रहांचा राजा मानलं जातं. त्यामुळे सूर्यदेवांना समर्पित असलेल्या रविवारी मांसाहार केला जात नाही. शिवाय असं म्हणतात की, रविवारची सुरूवात सूर्यदेवांच्या आशीर्वादाने झाल्यास आयुष्यात सकारात्मकता येते. (फोटो सौजन्य : Canva)
advertisement
advertisement