केरळमधील पद्मनाभ स्वामींचं जालन्यात घ्या दर्शन, 2 महिने कष्ट करुन तयार केली कलाकृती

Last Updated:
गणेशोत्सव काळात विविध गणेश मंडळे गणरायासोबत एखादा सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करतात. जालन्यात पद्मनाभ स्वामींचं दर्शन घेता येणार आहे.
1/7
महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. सर्वत्र गणेश मंडळांनी उभारलेले देखावे भाविकांसाठी खुले झाले आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक संदेश देणारे हे देखावे गणेश भक्तांना आकर्षित करत आहेत.

advertisement
2/7
  राधाकृष्ण गणेश मंडळाने असाच एक भव्य दिव्य देखावा सादर केला आहे. या देखाव्यामध्ये केरळ येथील पद्मनाभ मंदिराचा हुबेहूब प्रतिकृती आहे.
जालना शहरातील राधाकृष्ण गणेश मंडळाने असाच एक भव्य दिव्य देखावा सादर केला आहे. या देखाव्यामध्ये केरळ येथील पद्मनाभ मंदिराचा हुबेहूब प्रतिकृती आहे.
advertisement
3/7
जालना शहरातील गुडगल्ली भागात असलेल्या राधाकृष्ण मंडळाचे हे 27 वे वर्ष आहे. मागील दहा वर्षांपासून हे मंडळ आकर्षक देखावे सादर करते. यंदा सादर केलेला देखावा हा केरळ राज्यातील पद्मनाभ स्वामी मंदिराचा आहे.

4/7
या देखाव्यात थर्माकोलचा वापर करण्यात आला नाही. मंडळाच्या सत्तर सदस्यांनी स्वतः दीड महिन्याच्या अथक प्रयत्नांनी हा देखावा तयार केला असल्याचे मंडळ अध्यक्ष सागर संगम यांनी सांगितले.

5/7
केरळ मधील हे मंदिर देशातील 108 मंदिरमधील एक पवित्र मंदिर आहे. देखाव्यासाठी बाहेरील एकही कारागीर नसून केवळ मंडळ सदस्यांच्या अथक प्रयत्नांनी हा देखावा तयार करण्यात आला आहे. या देखाव्यात सात दरवाजे आहेत.

6/7
पद्मनाभ स्वामी मंदिरात निघालेले दागदागिने प्रत्यक्ष या ठिकाणी असलेल्या सात दरवाजांमध्ये दाखवण्यात आले आहेत. पद्मनाभ मंदिरातील जे शेवटचे द्वार आजही उघडलेले नाही त्याचे देखील हुबेहूब चित्रण या देखाव्यामधून करण्यात आले आहे.

7/7
हुबेहूब पद्मनाभ मंदिरासारखेच तीन द्वारांमधून मूर्तीचे दर्शन या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळते. विशेष म्हणजे या मंडळाकडून कोणाकडूनही वर्गणी न घेता हे देखावे सादर केले जातात. मंडळातील सदस्यच यासाठी आपली बचत खर्च करतात.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement