नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करताय? कोल्हापूरजवळची ही 5 प्रसिद्ध मंदिरे माहितीये का?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
Kolhapur Tourism: नव्या वर्षाची सुरुवात कोल्हापुरात देवदर्शनाने करण्याचा विचार असेल तर 5 प्रसिद्ध मंदिरांचं दर्शन एका दिवसात घेऊ शकता.
देशभरातील पर्यटकांना कोल्हापूरचं एक वेगळं आकर्षण आहे. निसर्गसौंदर्य, धबधबे, धार्मिक स्थळे, खाद्य संस्कृती कृषी अशा सर्वच बाबींचा विचार करता पर्यटनासाठी कोल्हापूर अनेकांची पहिली पसंती असते. नवीन वर्षाच्या स्वागताला आपणही कोल्हापुरात फिरण्याचं नियोजन करत असाल तर एका दिवसात या 5 प्रसिद्ध मंदिरांना भेट देऊन दर्शन घेऊ शकता.
advertisement
श्री अंबाबाई मंदिर: कोल्हापूर म्हटलं की करवीर निवासिनी अंबाबाई सर्वांच्या आस्थेचा विषय आहे. कोल्हापुरात आलेला माणूस अंबाबाई मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय परतत नाही. राज्यातील साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणारं अंबाबाई मंदिर प्रमुख धार्मिक केंद्र आहे. हे मंदिर स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना मानलं जातं. तसेच भवानी मंडप, जुना राजवाडा, रंकाळा पाहून महाद्वार रोडची खरेदी पर्यटकांना नक्कीच आवडते.
advertisement
advertisement
प्रयाग चिखली : कोल्हापूरच्या हद्दीलगत असलेल्या चिखली या गावानजीक पंचगंगेचे उगमस्थान आहे. प्रयाग संगमाच्या काठावर श्री दत्त मंदिर आहे. या ठिकाणाला वैदिक धर्माने व ऋषी मुनींच्या वास्तव्याने महत्त्व प्राप्त झाले होते. भैरवतीर्थ असाही याचा उल्लेख येतो. पाच नद्यांच्या संगमातून इथंच पंचगंगा नदीचा उगम होत असल्याने हे दृश्य डोळ्यांचं पारणं फेडणारं आहे. कोल्हापुरात आलं की हे ठिकाणं पाहिलंच पाहिजे.
advertisement
टेंबलाई टेकडी: टेंबलाई देवी ही कोल्हापूरकरांचं आराध्य दैवत आहे. टेंबलाई टेकडी येथे यमाई देवीचं देखील एक मंदिर आहे. इथं लहान बगीचा असून गणपतीची विशाल मूर्ती देखील आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात इथे त्र्यंबोली यात्रा उत्सव असतो. कोल्हापुरात मिलिटरी कॅम्प परिसरात असणाऱ्या टेंबलाई देवीच्या दर्शनासाठी आवर्जून लोक येत असतात.
advertisement
advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात धार्मिक पर्यटनासाठी इतरही काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. यामध्ये आदमापूर बाळू मामा मंदिर, गगनबावडा येथे गगनगिरी महाराजांचा मठ, नृसिंहवाडी येथील मंदिर, खिद्रापूरचं शिव मंदिर देखील आवर्जून भेट देण्यासारखं आहे. तरीही आपल्याकडे फक्त एकच दिवस असेल तर एका दिवसात कोल्हापूर जवळची ही 5 ठिकाणे आपण पाहू शकता.