Religious: दरवेळी अंगठ्यानंच नाही ओढायचा! कोणत्या प्रसंगी, कोणत्या बोटानं नाम लावणं शुभ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Tilak Sanskar Vidhi : कपाळावर नाम ओढणं/ टिळा लावणं हे भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. शुभ कार्यात कपाळावर नाम ओढला जातो. ज्योतिषी आचार्य पंडित योगेश चौरे यांच्याकडून जाणून घेऊया कोणत्या प्रसंगी कोणत्या बोटाने नाम लावावा, त्यामागील कारणे काय आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अनामिका - करंगळी शेजारी अनामिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बोटामुळे मानसिक शक्ती मजबूत होते. हे बोट सूर्य ग्रहाशी संबंधित आहे. शास्त्रांनुसार, या बोटाने देव, गुरु किंवा इतर कोणत्याही शुभ प्रसंगी टिळा लावावा. या बोटाने नाम लावल्याने मानसिक ऊर्जा वाढते आणि अज्ञ चक्र जागृत होते, ज्यामुळे व्यक्तीमध्ये एक नवीन ऊर्जा येते.
advertisement
मधले बोट - शास्त्रांमध्ये मधल्या बोटाला खूप महत्त्व आहे. हे बोट शनी ग्रहाशी संबंधित आहे. हाताचे हे सर्वात लांब बोट असून स्वतःला टिळा/नाम लावताना फक्त मधल्या बोटानेच लावावे. विशेषतः पूजेच्या वेळी, देवाला नाम/टिळा लावल्यानंतर मधल्या बोटाने आपल्या कपाळावर टिळा लावावा. हे बोट आत्म्याला शुद्ध करते आणि व्यक्तीला आंतरिक शांती प्राप्त होते.
advertisement
advertisement
अंगठा - अंगठा शुक्र ग्रहाशी संबंधित आहे, जो कीर्ती आणि संपत्तीचा कारक मानला जातो. अंगठ्याने नाम/ टिळा लावल्यानं व्यक्तीला कीर्ती आणि समृद्धी मिळते. विशेषतः दसरा आणि रक्षाबंधन सारख्या सणांवेळी किंवा रक्षाबंधन वेळी अंगठ्याने नाम लाववा, विजयासाठी प्रार्थना करतात. या बोटाचा नाम जीवनात यश आणि संपत्ती प्राप्तीचे प्रतीक आहे.


