काळा रंग अशुभ, तर मंगळसूत्रामध्ये काळे मणी शुभ का मानले जातात?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू धर्मात 'काळा रंग' सहसा शोक किंवा अशुभाचे प्रतीक मानला जातो, त्यामुळे कोणत्याही शुभ कार्यात काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे टाळले जाते. मात्र, विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे लेणे असलेल्या 'मंगळसूत्रामध्ये' काळ्या मण्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
advertisement
वाईट नजरेपासून संरक्षण: काळा रंग हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारा मानला जातो. लग्न ही आयुष्यातील एक मोठी आणि आनंदाची घटना असते. पती-पत्नीच्या सुखी संसाराला कोणाचीही वाईट नजर लागू नये, यासाठी मंगळसूत्रात काळे मणी गुंफले जातात. हे मणी नकारात्मकतेला स्वतःमध्ये सामावून घेतात आणि दांपत्याचे रक्षण करतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
परंपरेचे पावित्र्य: संस्कृतमध्ये 'मंगळ' म्हणजे पवित्र आणि 'सूत्र' म्हणजे धागा. हा पवित्र धागा केवळ सौंदर्यासाठी नसून तो पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी असतो. काळ्या मण्यांमुळे या पवित्र धाग्याची शक्ती द्विगुणित होते, असे मानले जाते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)









