RCB Win IPL 2025: कडकडीत आलिंगन, कपाळावर चुंबन, डोळ्यातून घळाघळा अश्रू, अनुष्काच्या मिठीत विराट रडला
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
RCB Win IPL 2025: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने २०२५ च्या IPL मध्ये पहिल्यांदाच विजेतेपद मिळवत क्रिकेटजगतात नवा इतिहास रचला. विराट कोहलीच्या अश्रूंनी आणि अनुष्काच्या जल्लोषाने हा क्षण अजूनच अविस्मरणीय ठरला.
advertisement
अंतिम चेंडू टाकल्यानंतर जेव्हा RCBने विजयावर शिक्कामोर्तब केले. तेव्हा स्टेडियममधील प्रेक्षकांच्या आनंदाचा लाट कॅमेऱ्यात कैद झाली. अभिनेता-निर्माती आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आनंदाने उड्या मारताना दिसली. तिच्या चेहऱ्यावर अपार उत्साह झळकत होता. तिने पांढऱ्या सैल शर्टसह चमकदार डेनिम पॅन्ट्स परिधान केल्या होत्या. ती अविश्वासाने डोके धरून बसलेली आणि जोरात टाळ्या वाजवतानाही दिसली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement