गौतम गंभीरने झटकले हात? पराभवाची दिली 'ही' 5 कारणं; Press Conference मध्ये म्हणाला...
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला 5 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. रोहित, विराट सारख्या अनुभवी खेळाडूंच्या निवृत्तीनंतर भारताचा तरुण संघ इंग्लंडसह भिडत आहे. पहिल्या सामन्यात जवळच्या फरकाने भारताला पराभव पत्करावा लागला. या तरुण संघाने पहिल्याच दिवशी त्यांच्या फलंदाजीने सर्वाना आश्चर्यचकित केलं पण फिल्डिंग आणि गोलंदाजीमध्ये ते आपली जादू दाखवू शकले नाही.

advertisement
advertisement
भारताच्या पाच विकेटनी पराभवानंतर गंभीर म्हणाला, "आपल्याला गोलंदाजांना वेळ द्यावा लागेल. यापूर्वी आमच्या संघात चार वेगवान गोलंदाज होते ज्यांना 40 पेक्षा जास्त कसोटी सामन्यांचा अनुभव होता. एकदिवसीय किंवा टी-20 सामन्यांमध्ये त्याचा इतका मोठा प्रभाव पडत नाही, परंतु जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलिया, इंग्लंड किंवा दक्षिण आफ्रिकेचा दौरा करून कसोटी सामने खेळता तेव्हा अनुभव खूप महत्त्वाचा असतो.
advertisement
advertisement
advertisement
भारतीय संघाच्या पराभवाबद्दल बोलताना गौतम गंभीर म्हणाला, 'सर्वप्रथम, मी तुम्हाला सांगतो की ते प्रयत्न करत नव्हते असे नाही.' खरं तर, 8 व्या ते 11 व्या क्रमांकाच्या भारताच्या खेळाडूंनी दोन्ही डावांमध्ये एकत्रितपणे फक्त 9 धावा केल्या. गंभीर पुढे म्हणाला, 'कधीकधी लोक अपयशी ठरतात आणि ते ठीक आहे. मला माहित आहे की ते निराशाजनक आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते इतरांपेक्षा जास्त निराश आहेत. कारण त्यांना माहित होते की आमच्याकडे संधी आहे.
advertisement
शुभमन गिलने कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. गंभीर म्हणाला की गिल कर्णधार म्हणून आणखी सुधारणा करत राहील. तो म्हणाला, 'कर्णधार म्हणून हा त्याचा पहिलाच कसोटी सामना होता, त्यामुळे थोडे घाबरणे स्वाभाविक आहे. खूप कमी लोकांना अशी संधी मिळते आणि त्याने उत्तम कामगिरी केली. यशस्वी कर्णधार होण्यासाठी त्याच्यात सर्व गुण आहेत, आपल्याला फक्त त्याला थोडा वेळ द्यावा लागेल.'