गर्भवती मातेची 2 लेकींसह विहिरीत उडी, चिमुकलीच्या आवाजाने गाव सुन्न, 'ती' वाचली आणि...
- Published by:Arjun Nalavade
 
Last Updated:
Satara News : परळी खोऱ्यातील कारी गावातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या एका गर्भवती मातेने तिच्या...
Satara News : परळी खोऱ्यातील कारी गावातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या एका गर्भवती मातेने तिच्या दोन लहान मुलींसह विहिरीत उडी घेतली. या घटनेत आईसह एका मुलीचा दुर्दैवी अंत झाला आहे, तर एका चिमुकलीचा जीव वाचवण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत मातेच्या गर्भातील बाळाचाही मृत्यू झाला आहे.
ऋतुजा विशाल मोरे (वय-27) आणि स्पृहा विशाल मोरे (वय-3) अशी दुर्दैवी मृत्यू झालेल्या माय-लेकींची नावे आहेत. सुदैवाने, त्यांची मोठी मुलगी त्रिशा विशाल मोरे (वय-6) या घटनेतून बचावली आहे.
घडले काय?
मुंबईमध्ये आपला छोटा व्यवसाय करणारे विशाल मोरे हे पत्नी ऋतुजा आणि दोन मुलींसह गणेशोत्सवासाठी आपल्या गावी, कारी येथे आले होते. उत्सवानंतर पुन्हा मुंबईला परत जाण्याचा त्यांचा बेत होता. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.
advertisement
गुरुवारी दुपारच्या वेळी घरात नेमके काय घडले, हे कळू शकले नाही. ऋतुजा तिच्या दोन्ही मुलींना घेऊन घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीकडे गेल्या आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मुलींसह विहिरीत उडी घेतली. विहिरीमध्ये झाडाची फांदी होती, ती मोठी मुलगी त्रिशाच्या हातात आली आणि ती त्या फांदीला लोंबकळत राहिली.
या तिघींच्या किंकाळ्या ऐकून परिसरातून गणपतीसाठी हाराळी आणायला आलेल्या काही ग्रामस्थांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेतली. त्यांनी त्रिशाला फांदीला लोंबकळताना पाहिले आणि तिला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत ऋतुजा आणि स्पृहा एकमेकींना बिलगून बुडाल्या होत्या. ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाले असून, प्रत्येक सर्वत्र शोककळा पसरली आहे. एका क्षणात एका हसत्या-खेळत्या कुटुंबाची वाताहत झाली आहे.
advertisement
हे ही वाचा : Accident News : 3 सेंकदात जीव गेला, भरधाव ट्रॅव्हल्सने 16 वर्षीय मुलीला चिरडलं, अपघाताचा थरारक VIDEO
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 06, 2025 7:47 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
गर्भवती मातेची 2 लेकींसह विहिरीत उडी, चिमुकलीच्या आवाजाने गाव सुन्न, 'ती' वाचली आणि...


