IPL लिलावात अनसोल्ड गेले तर करिअर संपणार, 5 दिग्गज खेळाडूंनी सुरू केला देवाचा धावा!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 अनेक नव्या खेळाडूंसाठी संधी घेऊन येईल, पण अनेकांसाठी ही त्यांच्या करिअरमधील शेवटची संधीही ठरू शकते. 16 डिसेंबरला होणाऱ्या मिनी ऑक्शनमध्ये अनेक दिग्गजांचं भवितव्य पणाला लागलं असेल.
advertisement
राहुल त्रिपाठीला एकेकाळी टीम इंडियाचा पुढचा स्टार म्हणून मानलं जात होतं, पण त्याची आयपीएलमधील कारकीर्द हळूहळू घसरत चालली आहे. 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये केकेआरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर राहुल त्रिपाठीची कारकीर्द बहरली नाही. राहुलही मागच्या मोसमात सीएसकेकडे होता, पण खराब कामगिरीनंतर त्यालाही सीएसकेने रिलीज केलं.
advertisement
advertisement
advertisement


