KKR मध्ये 'हार के जितने वाला बाजीगर नहीं', शाहरुख करणार 5 खेळाडूंची हकालपट्टी, Ajinkya Rahane चाही नारळ फिक्स?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Kolkata Knight Riders release List : कोलकाता नाईट रायडर्स (KKR), गतविजेते असूनही, आयपीएल २०२५ च्या हंगामात आठव्या स्थानावर राहिले. केवळ १२ गुण मिळवून त्यांनी निराशाजनक कामगिरी केली. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये अनेक टप्प्यांवर संघाला संघर्ष करावा लागला. अशातच केकेआर पाच खेळाडूंना नारळ देण्याची शक्यता आहे.
वेंकटेश अय्यर: आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात केकेआरने वेंकटेश अय्यरला २३.७५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. २०२४ च्या विजेतेपदात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी, २०२५ मध्ये त्याची कामगिरी अपेक्षांनुसार नव्हती. त्याने केवळ १४२ रन बनवले आणि गोलंदाजीही केली नाही. त्याच्या मोठ्या किमतीमुळे, संघ त्याला रिलीज करून मोठी रक्कम वाचवू शकतो आणि लिलावात त्याला कमी किमतीत पुन्हा खरेदी करण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा त्या पैशातून इतर महत्त्वाच्या खेळाडूंना लक्ष करू शकतो.
advertisement
अॅनरिक नॉर्जे: वेगवान गोलंदाज अॅनरिक नॉर्जेला ६.५० कोटी रुपयांमध्ये विकत घेतले होते. दुखापतीमुळे त्याला २०२५ मध्ये फक्त दोन सामने खेळता आले, ज्यात त्याला केवळ एक विकेट मिळाली. केकेआरकडे आधीच सुनील नारायण आणि आंद्रे रसेलसारखे परदेशी खेळाडू आणि भारतीय गोलंदाजांचा चांगला पूल असल्याने, नॉर्जेला रिलीज करून परदेशी खेळाडूचा एक महत्त्वाचा स्लॉट मोकळा करू शकतो.
advertisement
क्विंटन डी कॉक: अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक या हंगामात अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. आठ सामन्यांत त्याने १५२ रन केले, ज्यात फक्त एक अर्धशतक (९७ रन) होते. संघाकडे रहमानुल्लाह गुरबाजसारखा तरुण यष्टिरक्षक-फलंदाज असल्याने, डी कॉकला रिलीज करून संघ परदेशी खेळाडूच्या जागेचा अधिक प्रभावीपणे वापर करण्याचा विचार करू शकतो.
advertisement
स्पेन्सर जॉन्सन: ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनला २.८० कोटी रुपयांना विकत घेतले होते. २०२५ मध्ये त्याला फक्त चार सामने खेळता आले आणि त्यात त्याला केवळ एक विकेट मिळाली. त्याचा इकॉनॉमी रेटही ११.७३ होता, जो टी-२० क्रिकेटसाठी खूप जास्त आहे. केकेआरला अधिक विश्वसनीय वेगवान गोलंदाजांची गरज असल्याने, त्याला रिलीज करणे हा एक पर्याय असेल.
advertisement
मोईन अली: अष्टपैलू मोईन अलीला २०२५ मध्ये फारशा संधी मिळाल्या नाहीत. त्याने दोन डावांमध्ये फक्त ५ रन केले आणि ६ विकेट्स घेतल्या. तो एक अनुभवी खेळाडू असला तरी, संघाची फलंदाजी मजबूत असल्याने आणि नारायण-रसेलसारखे अष्टपैलू असल्याने, एका परदेशी जागेसाठी तो योग्य पर्याय ठरत नाही. वय ३८ च्या जवळ येत असल्याने, केकेआर तरुण खेळाडूंना संधी देण्याचा विचार करू शकते.