Prithvi Shaw : पृथ्वी शॉने 7 मिनिटात घेतला यु-टर्न, अचानक घडला चमत्कार; इन्स्टाग्रामवर स्टेटस टाकताच काय घडलं?

Last Updated:
Prithvi Shaw IPL Auction Drama : 26 वर्षांचा पृथ्वी शॉ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. नुकताच त्याने रणजी करंडकाच्या इतिहासात दुसरं सर्वात वेगवान द्विशतक झळकावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अशातच आता तो दिल्ली कॅपिटल्ससोबत खेळणार आहे.
1/5
आयपीएल 2026 च्या मिनी ऑक्शनमध्ये एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असं जबरदस्त नाट्य पाहायला मिळालं. भारताचा स्फोटक सलामीवीर पृथ्वी शॉ याच्यासाठी हा लिलाव एखाद्या 'रोलर कोस्टर राईड'सारखा ठरला.

advertisement
2/5
सुरुवातीला दोनदा नाव पुकारूनही कोणत्याही संघाने रस न दाखवल्याने पृथ्वी शॉची निराशा झाली होती, मात्र तिसऱ्या प्रयत्नात दिल्ली कॅपिटल्सने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेत अनपेक्षित सुखद धक्का दिला.

3/5
75 लाख रुपयांच्या मूळ किमतीसह पृथ्वी शॉ लिलावात उतरला होता. मात्र, जेव्हा सलग दोन वेळा तो अनसोल्ड राहिला, तेव्हा पृथ्वी शॉला स्वतःवरचा विश्वास गमावल्यासारखं वाटलं. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली,

4/5
ज्यामध्ये त्याने 'It's Okay' असं लिहीत हृदय तुटलेला (Broken Heart) इमोजी टाकला होता. त्याची ही हताश झालेली पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली.

5/5
पण नशिबाचे फासे फिरले! लिलावाच्या शेवटच्या टप्प्यात तिसऱ्यांदा त्याचं नाव पुकारलं गेलं आणि दिल्ली कॅपिटल्सने त्याला त्याच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केलं. यानंतर अवघ्या 7 मिनिटांच्या आत पृथ्वीने स्टोरी डिलीट केली.

Pradnya Rajeev Satav: राहुल गांधींच्या विश्वासू दिवंगत सहकाऱ्याची पत्नी, आता भाजपात करणार प्रवेश, कोण आहेत आमदार प्रज्ञा सातव?
राहुल गांधींच्या विश्वासू दिवंगत सहकाऱ्याची पत्नी, आता भाजपात करणार प्रवेश, कोण
  • राहुल गांधींच्या विश्वासू दिवंगत सहकाऱ्याची पत्नी, आता भाजपात करणार प्रवेश, कोण

View All
advertisement